चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली ३५ वर्षीय पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 20:38 IST2022-10-22T20:38:25+5:302022-10-22T20:38:52+5:30

आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime Husband killed 25-year-old wife due to suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली ३५ वर्षीय पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली ३५ वर्षीय पत्नीची हत्या

चाकण: चारित्र्याच्या संशयावरून कुरुळी (ता. खेड) येथे पतीने हाताने आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पतीला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. पतीचे नाव सतीश भानुदास जाधव (४०) असून तो कुरुळीचा रहिवासी आहे. हृषीकेश भारत थिटे (वय २३ वर्षे, रा.डांगे चौक, थेरगाव, मूळ रा.बोदेगाव,परळी, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मयत मैना जाधव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहीण मैना सतीश जाधव (वय ३५, रा. कुरुळी) ही पती सतीश जाधव सोबत कुरुळी येथे भाड्याच्या खोलीत दोन मतिमंद मुलांसह राहत होते. आरोपी सतीश हा फिर्यादी यांच्या मयत बहीण मैना हिला लग्न झाल्यावर चारित्र्याच्या संशयावरून आणि दोन्ही मुले मतिमंद झाली यावरून सतत मारहाण करत होता. तू कामाला जाऊ नकोस असे सांगत सतीश याने मैना हिला मारहाण केली, तिला लाथाबुक्क्यांनी मारझोड केली. त्यावेळी डोक्याला जखम झाल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्यात मैना हिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी, पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करीत आहेत.

Web Title: Pune Crime Husband killed 25-year-old wife due to suspicion of character