शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 08:53 IST

सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वीही पुण्यातील वारजेत एका तरुणाने समाज माध्यमात मजकूर लिहिल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी पुण्यातील एकाने समाज माध्यमात धमकीचा मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे.  गुन्हे शाखेकडून त्याबाबत सखोल तपास सुरू असून, सिद्दीकी यांच्या खुनाच्या कटाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोचत असल्याचे यातून समोर येत आहे. 

सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वीही पुण्यातील वारजेत एका तरुणाने समाज माध्यमात मजकूर लिहिल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या संदेशात लाॅरेन्स बिष्णोई, त्याचा भाऊ अमोल बिष्णोई यांच्या नावाने सिद्दीकी यांना धमकावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी शिवाचा पुण्यात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय हाेता, अशी माहिती तपासात मिळाली आहे.  

अकाेटातील लाेणकर भावंडांचा शाेधबाबा सिद्दीकी यांच्या हत्येची व हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची फेसबुक पाेस्ट शुभम उर्फ शुभू लाेणकर याने अपलाेड केल्याचा संशय पाेलिसांना आहे. त्यामुळे अकाेट तालुक्यातील नेव्हरी येथील लाेणकरचा काही दिवसांपूर्वी बिश्नाेई गँगसाेबत असलेला संपर्क यावरून पाेलिसांनी त्याच्या मूळगावात शाेध घेतला. मात्र, त्याच्यासह भावाने जून २०२४ पासून गाव साेडल्याची माहिती अकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी दिली.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीDeathमृत्यू