Psycho killer killed his family then murdered tuition teacher and did sex with dead body in Jamshedpur | खळबळजनक! घरी आलेल्या शिक्षिकेची हत्या करून मृतदेहावर केला रेप, 'त्याने' आधी बायको-मुलींचा घेतला होता जीव!

खळबळजनक! घरी आलेल्या शिक्षिकेची हत्या करून मृतदेहावर केला रेप, 'त्याने' आधी बायको-मुलींचा घेतला होता जीव!

झारखंडच्या जमशेदपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. टाटा स्टीलच्या फायर ब्रिगेड विभागातील एका कर्मचाऱ्याने असं अमानवीय कृत्य केलं की, ज्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीपक नावाच्या व्यक्तीने आधी पत्नी, दोन मुलींची हत्या केली आणि नंतर घर आलेल्या ट्यूशन टीचरचीही हत्या केली. इतकंच नाही तर त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहसोबत संबंध ठेवला. आऱोपी हा सायको किलर असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी दोघांची करायची होती हत्या

टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, जमशेदपूरमध्ये एका घरात चार लोकांच्या मर्डरची बातमी समोर आली तर सगळ्यांना धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुर केल्यावर जे समोर आलं ते हैराण करणारं होतं. पोलिसांनी चार जणांची हत्या करणाऱ्या दीपकला अटक केली. आरोपी कशाप्रकारचा सायको किलर होता याचा यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, चार लोकांची हत्या केल्यावर तो आणखी दोन लोकांची हत्या करणार होता. (हे पण वाचा : धक्कादायक! शेणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालं कडाक्याचं भांडण, एकाने गोळी झाडून केली दुसऱ्याची हत्या.....)

आधी हत्या केली नंतर केला रेप

मीडिया रिपोर्टनुसार, दीपक कर्जाच्या ओझ्याखाली होता आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात त्याला पार्टनरने फसवले होते. यानंतर सर्वातआधी त्याने मित्राची हत्या करण्याचा विचार केला. पण नंतर त्याने विचार केला की, तुरूंगात जावं लागलं तर परिवार रस्त्यावर येईल. त्यामुळे त्याने आधी परिवाराला संपवलं. परिवाराला संपवल्या ट्यूशन घरी आली तर त्याने तिचीही हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहासोबत सेक्स केला. जेव्हा मित्र आणि त्याचा मेहुणा घरी आला तर त्याने त्यांच्यावरही हल्ला केला. दोघेही जीव वाचवून तेथून पळाले. (हे पण वाचा : खळबळजनक! गळा आवळून पती-पत्नीची हत्या; अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब)

बुलेट घेऊन फरार

त्यानंतर आरोपीने बुलेट काढली आणि ओडिशातील राउरकेला येथे गेला. त्यानंतर काही दिवस तो वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिला. घरातून जे दागिने तो घेऊन गेला होता ते त्याने साडे चार लाखात विकले. पोलिसांनुसार, आरोपीला वेबसीरीज बघण्याची सवय होती. त्या बघूनच तो सायको किलर झाला होता.
 

Web Title: Psycho killer killed his family then murdered tuition teacher and did sex with dead body in Jamshedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.