Neighbor shot dead in a dispute over cow dung Ghazipur Uttar Pradesh | धक्कादायक! शेणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालं कडाक्याचं भांडण, एकाने गोळी झाडून केली दुसऱ्याची हत्या.....

धक्कादायक! शेणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालं कडाक्याचं भांडण, एकाने गोळी झाडून केली दुसऱ्याची हत्या.....

उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये केवळ गायीच्या शेणावरून झालेल्या वादात दोन शेजाऱ्यांनी आधी भांडणं केलं नंतर एकाने दुसऱ्याची हत्या केली. गायीच्या चुकीवरून झालेल्या वादातून एका शेजाऱ्याने दुसऱ्यावर गोळी झाडली. ही घटना उत्तर प्रदेशातील संकरा गावातील आहे.

या गावात गायीच्या शेणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झालं होतं. गायीच्या शेणापासून तयार गवऱ्या मृत व्यक्तीच्या प्राण्याने तुडवल्या. त्यामुळे गवऱ्या तुटल्या. यावरून बिंद नावाची व्यक्ती शेजारी राहणाऱ्या मुन्ना नावाच्या व्यक्तीवर रागावला. बिंदने याच रागात मुन्नावर गोळी झाडली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. (हे पण वाचा : खळबळजनक! गळा आवळून पती-पत्नीची हत्या; अंगावरील पाच लाखांचे दागिने गायब)

मीडिया रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीच्या भावाचं लग्न होणार होतं. हत्येची माहिती मिळताच गावातील लोक संतापले आणि गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची गंभीरता बघता गाजीपूर एसपी स्वत: पोलीस दल घेऊन तिथे पोहोचले आणि गावकऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. (हे पण वाचा : धक्कादायक! गर्भवती गर्लफ्रेन्डने ब्रेकअप केलं म्हणून बॉयफ्रेन्डने चाकूने सपासप वार करत घेतला तिचा जीव!)

गावात हत्येमुळे निर्माण झालेला तणाव बघता परिसराला छावणीचं रूप आलं होतं. जेणेकरून दुसरी कोणतीही अनुचित घटना घडू नये. पोलिसांनी माहिती दिली की, संकरा गावातील विशाल बिंदच्या गायीच्या शेणाच्या गवऱ्या मुन्ना बिंदच्या प्राण्याने मोडल्या. यावरून दोघात वाद झाला. त्यानंतर मुन्ना बिंद घरासमोर बसला होता त्यावेळी विशाल बिंद साथीदारासोबत आला आणि त्याने मुन्ना बिंदवर गोळी झाडली. विशाल बिंद तेथून फरार झाला होता. लकवरच त्याला अटक करण्यात आली.
 

Web Title: Neighbor shot dead in a dispute over cow dung Ghazipur Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.