An abusive guy in Germany killed his pregnant girlfriend after she broke up with him | धक्कादायक! गर्भवती गर्लफ्रेन्डने ब्रेकअप केलं म्हणून बॉयफ्रेन्डने चाकूने सपासप वार करत घेतला तिचा जीव!

धक्कादायक! गर्भवती गर्लफ्रेन्डने ब्रेकअप केलं म्हणून बॉयफ्रेन्डने चाकूने सपासप वार करत घेतला तिचा जीव!

जर्मनीतील एका माथेफिरू प्रियकराने त्याच्या गर्भवती गर्लफ्रेन्डवर ६० वेळा चाकून सपासप वार केले. तरूणीने या व्यक्तीसोबत ब्रेकअप केलं होतं. जे तरूणाला सहन झालं नाही. २३ वर्षीय तरूणावर महिलेला टॉर्चर करणे आणि त्याच्यासोबत हिंसा करण्याचा आरोप आहे. त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे.

तुर्कीमध्ये राहणारा २३ वर्षीय आलिम के ने स्वीकारलं की त्याने त्याच्या २२ वर्षीय गर्लफ्रेन्ड जुवी-एनवर कार पार्किंगमध्ये चाकूने वार केले होते. यानंतर त्यने तिचा मृतदेह तिच्या घराच्या काही अंतरावरच दफन केला होता. जर्मनीच्या हॅम शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. (हे पण वाचा : खळबळजनक! २५ महिलेवर गँगरेप करून हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक )

जर्मनी मीडिया बाइल्डनुसार, २२ वर्षीय ही तरूणी ४ महिन्यांची गर्भवती होती. आपल्या गर्लफ्रेन्डला मारल्यानंतर त्याने तिचा मृतहेद तिच्या घरापासून केवळ १०० मीटर अंतरावरील एका जागेवर दफन केला होता. याप्रकरणी जुवीच्या आईने सांगितले की, आलिम तिला टॉर्चर करत होता. कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता आणि  तिला मारहाण करत होता. पण ती तरी त्याच्याकडे जात होती. एकदा तर त्याने रागाच्या भरात जुवीचे केस कापले होते.

जुवीच्या पालकांनी सांगितले की, आलिमने जुवीला धमकी दिली होती की, जर तिने आलिमला सोडलं तर तो तिला जीवे मारेल. तसेच या घटनेनंतर आलिमची एक्स-गर्लफ्रेन्डही समोर आली आहे. तिने आलिमवर रेपचा आरोप केला. आलिम अटक झाल्यावर म्हणाला की, त्याला त्याने जे केलं त्याचा पश्चाताप आहे. त्याला वडील व्हायचं होतं. पण त्याला हे माहीत नाही की त्याने कंट्रोल कसा सोडला. या केसची चौकशी सुरू आहे. आलिमला याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Web Title: An abusive guy in Germany killed his pregnant girlfriend after she broke up with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.