मुलुंड येथे सोसायटीची सरंक्षण भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 21:53 IST2019-07-02T21:44:48+5:302019-07-02T21:53:10+5:30
याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलुंड येथे सोसायटीची सरंक्षण भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
ठळक मुद्दे मुलुंड पश्चिमेकडील फाल्गुनी सोसायटीची सरंक्षण भिंत कोसळली. मुलुंड जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुंबई - मुलुंड पश्चिमेकडील फाल्गुनी सोसायटीची सरंक्षण भिंत पडल्याने सुरक्षारक्षक करी सिंग यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काल रात्री ११ वाजताच्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील फाल्गुनी सोसायटीची सरंक्षण भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली. भिंत पडल्याने भिंतीच्या ढिगाऱ्याखाली इमारतीचा सुरक्षारक्षक करी सिंग (४५) हे अडकून जखमी झाले. घटनास्थळी मुलुंड पोलिसांनी धाव घेऊन त्यांना मुलुंड जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.