एकीला लग्नाचे वचन, तर लग्नगाठ दुसरीशीच!, बोहल्यावर चढण्यापूर्वीच ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 06:16 IST2021-12-31T06:16:17+5:302021-12-31T06:16:33+5:30

Kalyan : कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी येथे राहणारा अजय हा रेल्वेत नोकरीला आहे. मागील पाच महिन्यांपासून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने तिच्याबरोबर अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले.

Promise of marriage to one, but marriage to another in Kalyan | एकीला लग्नाचे वचन, तर लग्नगाठ दुसरीशीच!, बोहल्यावर चढण्यापूर्वीच ठोकल्या बेड्या

एकीला लग्नाचे वचन, तर लग्नगाठ दुसरीशीच!, बोहल्यावर चढण्यापूर्वीच ठोकल्या बेड्या

कल्याण : एका २९ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाचे वचन देणाऱ्या आणि तिचा विश्वासघात करून दुसरीबरोबर लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला बोहल्यावर चढण्यापूर्वीच कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  त्याचे बुधवारी लग्न होणार होते. परंतु, लग्नाला काही तासांचा अवधी असतानाच त्याला अमरावती येथून ताब्यात घेतले. अजय उर्फ विकी ॲन्थोनी फ्रान्सिस असे नवरदेवाचे नाव आहे.

कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी येथे राहणारा अजय हा रेल्वेत नोकरीला आहे. मागील पाच महिन्यांपासून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने तिच्याबरोबर अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले. यात ती गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपातही केला. तिने लग्नासाठी आग्रह केला असता अजयने नकार देऊन तिला शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. दरम्यान, अजयने तिला अंधारात ठेवून दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करण्याचा घाट घातला.

बुधवारी त्याचे लग्न अमरावती येथील बडनेरामध्ये होणार होते. याची माहिती प्रेयसीला मिळताच तिने तत्काळ कोळसेवाडी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तिच्यासह लग्नाच्या ठिकाणी धाव घेतली. लग्नाला काही तासांचा अवधी असताना बुधवारी पहाटे अजयला अटक केली. त्याला न्यायालयाने ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Promise of marriage to one, but marriage to another in Kalyan