Privately photographed sexually assaulting a young girl goes viral | तरुणीवर लैंगिक अत्याचार करून खासगी फोटो केले व्हायरल
तरुणीवर लैंगिक अत्याचार करून खासगी फोटो केले व्हायरल

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या गुरुचरण प्रीतम सहा (२२, रा. ढुमदार, उत्तराखंड) याला नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.


ठाण्यातील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा गुरुचरण याने ठाणे रेल्वेस्थानकाजवळ इंग्रजी स्पीकिंगचा क्लास लावला होता. याच क्लासमध्ये त्याची २१ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली होती. दोघेही एकाच क्लासमध्ये असल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी जवळीक साधून विश्वासात घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्याच नावाखाली ५ एप्रिल २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मासुंदा तलाव येथील एका लॉजवर नेऊन तिथे तिच्या संमतीशिवाय तिच्याशी त्याने शारीरिक संबंध ठेवले. त्याचवेळी त्याने तिच्या नकळत तिचे अश्लील फोटोही मोबाइलवर काढले. पुन्हा तिला लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह त्याने धरला. तिने नकार दिल्यानंतर मात्र त्याने तिचे हे फोटो तिचे मित्र आणि भावाच्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकून तिची बदनामीही केली. लैंगिक अत्याचार केल्यानंतरही त्याने तिचे फोटोही व्हायरल केल्यामुळे तिने अखेर याप्रकरणी ८ आॅक्टोबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला.


Web Title: Privately photographed sexually assaulting a young girl goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.