खळबळजनक! व्हिडीओ कॉल करून महिलेला दाखविले गुप्तांग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:49 IST2019-07-15T18:48:13+5:302019-07-15T18:49:44+5:30
सायबर पोलिसांच्या मदतीने खार पोलीस आरोपीचा शोध घेतला आहेत.

खळबळजनक! व्हिडीओ कॉल करून महिलेला दाखविले गुप्तांग
मुंबई - एका अनोळख्या व्यक्तीने महिलेला व्हिडीओ कॉल केला आणि गुप्तांग दाखवत हस्तमैथुन केल्याची संतापजनक, खळबळजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पीडित महिलेने या घटनेचा स्क्रिनशॉट काढला व तो पोलिसांना दिला आहे. महिलेला व्हिडीओ कॉल करून ऑनलाईन अश्लिल चाळे करून दाखवल्याची ही मुंबईतील पहिलीच घटना आहे. कारण रस्त्यावर, प्रवासात अशा याआधी अनेक घडल्या आहेत. याप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांच्या मदतीने खार पोलीस आरोपीचा शोध घेतला आहेत.
पीडित महिला वेब टेलिव्हिजन शोचे स्क्रिप्ट रायटिंग करते. तिला अनोळख्या क्रमांकावरून स्कायपीद्वारे मोबाईलवर व्हि़डीओ कॉल आला. तिने तो रिसिव्ह करताच समोरची व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. मात्र, गुप्तांग दाखवत हस्तमैथुन करताना व्हिडीओ कॉलवरून जाणीवपूर्वक दाखविले जात होते. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने लगेचच घटनेचा स्क्रिनशॉट काढला आणि तात्काळ मुंबई पोलिसांना ट्वीट करत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला एफआयआर करण्यासाठी खार पोलीस ठाण्यात बोलावले. सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या आरोपीची जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी लोकमतशी बोलताना दिली.