अश्लील हावभाव करून दाखवले गुप्तांग; लोअर परळ रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग
By पूनम अपराज | Updated: February 3, 2022 14:54 IST2022-02-03T14:41:41+5:302022-02-03T14:54:22+5:30
Molestation Case : मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोअर परळ येथे सोमवारी ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर अशा घडनांमुळे महिला प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अश्लील हावभाव करून दाखवले गुप्तांग; लोअर परळ रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग
पूनम अपराज
गजबजलेल्या मायानगरी मुंबईतील लोअर परळ रेल्वे स्थानकावर एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लोअर परळ रेल्वे स्थानकावर एका तरुणाने महिलेला पाहून अश्लील हावभाव केले. एवढेच नाही तर या विक्षिप्त तरुणाने महिलेसमोर आपले गुप्तांग दाखवले. आरोपीचे नाव शमशाद मुमताज अन्सारी असं आहे.
मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोअर परळ येथे सोमवारी ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर अशा घडनांमुळे महिला प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुर्ला परिसरात राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणी आणि तिच्या भावाने आरोपीचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पार्टीत विघ्न! बुफेच्या रांगेत साडीच्या पदराने पेट घातला, महिलेचा होरपळून मृत्यू
सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी CM ठाकरेंकडूनच दबाव, परमबीर सिंग यांचा धक्कादायक दावा
नेमकं काय घडलं?
मुंबई सेंट्रल जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला लोअर परळ ते चर्चगेट स्थानकादरम्यान लोकल ट्रेनने दररोज प्रवास करते. गेल्या ८ ते १० दिवसांपासून छेडछाडीची घटना सुरू होती. आरोपी महिलेला दररोज पाहून अश्लील कृत्य करत होता. सोमवारी सकाळीही ९.३३ वाजता महिलेला पाहून त्याने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.
पीडिता आणि भावाने पाठलाग केला
जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पीडितेच्या भावाने आरोपीला असे करण्यामागचे कारण विचारले असता, तो त्याला धक्काबुक्की करून पळून जाऊ लागला. यानंतर पीडिता आणि तिच्या भावाने आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडले आणि रेल्वे स्थानकावर उपस्थित पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपी शमशाद मुमताज अन्सारीला मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.