सांगली कारागृहात कैद्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

By शरद जाधव | Updated: March 17, 2023 17:54 IST2023-03-17T17:53:57+5:302023-03-17T17:54:16+5:30

वैयक्तिक कारणावरून प्रकार; सहा जणांवर गुन्हा दाखल

Prisoner beaten with kicks in Sangli Jail | सांगली कारागृहात कैद्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

सांगली कारागृहात कैद्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात असलेल्या एका कैद्याला इतर सहा कैद्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.  याप्रकरणी कारागृह कर्मचारी नागनाथ शंकर गुलादे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर ऊर्फ कृष्णा नरोटे, असे जखमी कैद्याचे नाव आहे.

रोहित ऊर्फ बाला गजानन गाडे (वय २६), योगेश दिलीप शिंदे (२७), करण रामा पाटील (२५), धनराज गजानन राऊत (२८), विजय ऊर्फ यशवंत भुपाल सोनवले (२५), दत्तात्रय यल्लाप्पा खांडकर अशी मारहाण केलेल्या संशयितांची नावे आहेत. जखमी सागर नरोटे हा कारागृहात आहे, तर संशयितही न्यायालयीन निर्णयामुळे तिथेच आहेत. कारागृहाबाहेर त्यांच्यात वाद होते. या कारणावरून सहा जणांनी नरोटे याला मारहाण केली. यात तो जखमी झाला आहे. मारहाणीचा प्रकार लक्षात येताच कारागृह कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Prisoner beaten with kicks in Sangli Jail