धावत्या व्हॅनमध्ये कैदी पोलिसांवर गेला धावून, अंगावर थुंकून घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 08:32 PM2020-02-29T20:32:56+5:302020-02-29T20:33:52+5:30

किरकोळ कारणावरून पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर कैद्याकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न.

prisoner attack on police and spit on his body BKP | धावत्या व्हॅनमध्ये कैदी पोलिसांवर गेला धावून, अंगावर थुंकून घेतला चावा

धावत्या व्हॅनमध्ये कैदी पोलिसांवर गेला धावून, अंगावर थुंकून घेतला चावा

Next

ठाणे - पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कैद्याने चक्क पोलिसाच्या अंगावर धावून जात त्याच्यावर थुंकून चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

मोहम्मद अंसारी असे या कैद्याचे नाव आहे. तो ठाण्यातील रहिवाशी आहे. न्यायबंदी असलेल्या या कैद्याला सुनावणीसाठी मुंबईतील दिंडोशी येथील न्यायालयात नेण्यात आले होते. तिथून परतत असताना पोलीस व्हॅनमध्ये त्याचा पोलिसांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला.

त्यानंतर मोहम्मद अंसारीने समोर बसलेल्या पोलिसाच्या अंगावर चाल केली. तसेच तो रागाच्या भरात त्या पोलिसावर थुंकला. तसेच त्याने पोलिसाच्या बोटाचा चावाही घेतला. दरम्यान, व्हॅनमध्ये असलेल्या इतर पोलिसांनी मध्ये पडत अखेर या कैद्याला रोखले. दरम्यान, नातेवाईकांनी आणलेले घरचे जेवण घेऊ न दिल्याने या कैद्याने पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

Web Title: prisoner attack on police and spit on his body BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.