पाणीपुरी घेऊन घरी आला पती, बाथरूममध्ये पडला होता गर्भवती पत्नीचा मृतदेह; बाल्कनीत बंद होती आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 16:50 IST2022-05-07T16:46:49+5:302022-05-07T16:50:03+5:30
Ghaziabad Crime News : पोलिसांनुसार, सूचना मिळाली होती की, साहिबाबाद डीएलएफ भागात महिलेचा मतदेह बाथरूममध्ये पडला आहे. गर्भवती महिलेची तारेने गळा आवळून हत्या करण्यात आली होती.

पाणीपुरी घेऊन घरी आला पती, बाथरूममध्ये पडला होता गर्भवती पत्नीचा मृतदेह; बाल्कनीत बंद होती आई
गाजियाबादच्या (Ghaziabad Crime News) साहिबाबादमध्ये एका गर्भवती महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी तारेने महिलेचा गळा आवळून घरात चोरी केली आणि फरार झाले. त्याआधी घरातील एका वृद्ध महिलेला बाल्कनीत बंद केलं होतं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेणं सुरू केलं आहे.
पोलिसांनुसार, सूचना मिळाली होती की, साहिबाबाद डीएलएफ भागात महिलेचा मतदेह बाथरूममध्ये पडला आहे. गर्भवती महिलेची तारेने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. डीएलएफ कॉलनीतील आशीर्वाद अपार्टमेंट बिल्डींग घर नंबर १७ मध्ये राहणारा संतोष कुमार शुक्रवारी ऑफिसमध्ये गेला होता. घरी त्याची २० वर्षीय पत्नी संतोषी उर्फ सोनू आणि वृद्ध आई होती.
रात्री संतोष बाजारातून पत्नीसाठी पाणीपुऱी घेऊन घरी आला. तेव्हा त्याला लाइट बंद दिसले. आवाज दिल्यावर समजलं की, त्याची आई बाल्कनीत बंद होती आणि पत्नीचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये पडला होता. तारेने गळा आवळून महिलेची हत्या करण्यात आली होती. कपाटातील सामान फेकलेलं होतं. संतोष कुमारनुसार, त्याची पत्नी एक महिन्याची गर्भवती होती. मृत महिलेच्या पतीने वरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मजुरांवर आणि ठेकेदार विपिनवर हत्या आणि चोरीचा संशय व्यक्त केला.
घटनेची सूचना मिळताच पोलिसांची झोप उडाली. पोलिसांच्या टीमने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. एसएसपीनुसार, सायंकाळी कामाहून घरी आल्यावर महिलेच्या पतीने घटनेची सूचना पोलिसांना दिली होती. महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला होता. कपाटातील लॉकर उघडं होतं. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.