शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

गर्भवती महिला रस्त्यावरच कोसळली, मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवली अन् पाडव्याला 'गुड न्यूज' मिळाली!

By पूनम अपराज | Published: April 15, 2021 9:10 PM

Mumbai Police Well Done : थेट मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दखल घेऊन त्या पोलिसांचं अभिनंदन केले आहे.

ठळक मुद्देएक महिला अचानक वरळी नाका येथे गुढी पाडव्यादिवशी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान चक्कर येऊन पडल्या अशी माहिती मिळाली असता तात्काळ वरळी पोलिसांची मोबाइल 1 व मोबाईल 5 ही वायरलेस वाहने सदर ठिकाणी हजर झाले.

पूनम अपराज

वरळी नाका येथे गुढी पाडव्यादिवशी मुंबई पोलिसांनी माणुसकी आणि प्रसंगावधान दाखवत कमालीचे कार्य केले. त्याची थेट मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दखल घेऊन त्या पोलिसांचं अभिनंदन केले आहे. ही माहिती नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. 

एक महिला अचानक वरळी नाका येथे गुढी पाडव्यादिवशी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान चक्कर येऊन पडल्या अशी माहिती मिळाली असता तात्काळ वरळी पोलिसांची मोबाइल 1 व मोबाईल 5 ही वायरलेस वाहने सदर ठिकाणी हजर झाले. महिला ही गर्भवती होती चक्कर येऊन पडल्याने तिला प्रसूती कळा चालू झाल्या होत्या. तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील किंवा ओळखीचे जवळ कोणीच नव्हते. महिलेची परिस्थिती नाजूक होती. तरी वरळी पोलीस स्टेशनमधील महिला पोलिस उपनिरक्षक रेश्मा पाटील, महिला कॉन्स्टेबल सपकळ आणि  ASI माने, इतर कर्मचारी यांनी तात्काळ वेळ न दवडता प्रसंगावधान दाखवत त्या गरोदर महिलेस कोणताही विचार न करता रुग्णवाहिकेचीची वाट न पाहता पोलीस गाडीत घेऊन सोबत मदतीला पादचारी स्थानिक रहिवाशी असलेली मुलगी नामे प्रिया जाधव हिला मदतीला घेऊन नायर रुग्णालयकरिता रवाना झाले.

महिलेला अधिक त्रास होऊ लागला म्हणून महिलेला गाडीतील महिला अधिकारी व महिला अंमलदार, स्थानिक मुलगी यांनी धीर दिला आणि महिलेची प्रसूती ही नायर रुग्णालय येथे पोहचण्याआधीच पोलिस गाडीमध्ये सुखरूप झाली आणि  महिलेसह बाळाचे प्राण वाचले. सदर महिला व बाळ हे सुखरूप असून महिला ही ७ महिन्यांची गरोदर असल्याने बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या महिलेस मुलगी झाली, हा आनंदाचा क्षण सर्वांसाठी होता असे विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले. संबंधित पोलीस मोबाइल 1 वरील Asi माने, हेड कॉन्स्टेबल वळवी, पोलीस  कॉन्स्टेबल कांबळे, मोबाइल ५ वरील पोलीस उपनिरीक्षक रेश्मा पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल सपकळ यांचे केलेल्या कर्तव्याबद्दल नांगरे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Proud of Mumbai police team which could render timely help to a pregnant woman in distress and could make the safe...

Posted by Vishwas Nangre Patil on Wednesday, April 14, 2021

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील