गरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:43 PM2021-05-13T20:43:56+5:302021-05-13T20:45:11+5:30

Gangrape : प्रियकरासह तिघांना अटक, धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पिडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली.

Pregnancy exposes gangarpe crime; Gangrape of a young girl by showing the lure of marriage | गरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप 

गरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप 

Next
ठळक मुद्देया तिघांनाही १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे : एका १६ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश कदम (२१) याच्यासह तिघांना वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. या तिघांनाही १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पिडित मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.

धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पिडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळयात ओढले. नंतर तिला लग्नाचे  अमिष दाखवून १२ ते १३ नोव्हेंबर २०२० रोजी त्याच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर तिच्या घरात हा प्रकार कोणाला समजू नये, यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने आकाशचा मित्र विकी उर्फ विकास करोतिया (२१) तसेच विकीचा मित्र सागर करोतिया (२६) यांनीही आकाशच्या घराजवळील परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातूनच ती चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. त्यावेळी तिने आईला ही आपबिती सांगितली. कुटूंबीय रागावतील या भीतीने आपण हा प्रकार सांगितला नसल्याचेही तिने सांगितले.

मुलीच्या आईने तातडीने याप्रकरणी  १२ मे २०२१ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक शीतल चव्हाण यांच्या पथकाने आकाश याच्यासह तिघांनाही अटक केली. 

Web Title: Pregnancy exposes gangarpe crime; Gangrape of a young girl by showing the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app