शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Video - दे दणादण! प्री-वेडिंग शूट करताना फोटोग्राफर्सना मारलं; परफेक्ट लोकेशनवर काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:18 IST

कर्नाटकात एका प्री-वेडिंग फोटोशूट दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे.

तुम्ही कधी प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये गोंधळ झालेला पाहिला आहे का? सहसा प्री-वेडिंग शूटमध्ये एक कपल, एखादं सुंदर, शांत ठिकाण, क्रिएटिव्ह आयडिया आणि फोटोग्राफर्सची टीम असते. ही टीम दोन व्यक्तींच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांना कॅमेऱ्यात कैद करत असते. मात्र, कर्नाटकात एका प्री-वेडिंग फोटोशूट दरम्यान याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं. एका फोटोशूटचे रूपांतर थेट हिंसक घटनेत झालं आणि त्यामागचं कारण होतं फोटोग्राफर्सनी मंदिरात चप्पल-बूट घालून प्रवेश करणं.

मनमोहक 'बेट्टाडा भैरवेश्वर' मंदिरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराच्या परिसरात कपलचं प्री-वेडिंग फोटोशूट सुरू होतं. याच दरम्यान फोटोग्राफर्सचा एक ग्रुप चप्पल आणि बूट घालून मंदिराच्या परिसरात शिरला. ही बाब स्थानिक लोकांच्या निदर्शनास येताच ते संतप्त झाले. रागाच्या भरात लोकांनी फोटोग्राफर्सच्या ग्रुपवर हल्ला केला आणि पाहता पाहता या घटनेने हिंसक वळण घेतलं.

सकलेशपूर तालुक्यातील हा मंदिर परिसर आपल्या निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्री-वेडिंग शूटसाठी हे ठिकाण अत्यंत परफेक्ट मानलं जातं. एक कपल आपल्या काही फोटोग्राफर्ससह येथे शूटसाठी आलं होतं. शूट सुरू असताना, मंदिर परिसरात फोटोग्राफी करणं आणि फोटोग्राफर्सनी बूट-चप्पल घातल्यामुळे काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर हाणामारीत झालं.

काही लोकांनी फोटोग्राफर्सवर हल्ला केला, ज्यामध्ये एका कॅमेऱ्याचंही नुकसान झालं, कॅमेरे तोडले. जखमी फोटोग्राफर्सना उपचारासाठी सकलेशपूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकलेशपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आशी, प्रशांत, रक्षा, अरविंद, उचित, प्रज्वल आणि निशांत यांचा समावेश आहे. नवी आणि नंदन अशी जखमी फोटोग्राफर्सची नावे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pre-wedding shoot turns violent: Photographers thrashed for wearing shoes in temple.

Web Summary : Karnataka pre-wedding shoot turned violent after photographers entered a temple with shoes. Locals attacked them, damaging equipment. Seven arrested; injured photographers hospitalized.
टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस