Video - दे दणादण! प्री-वेडिंग शूट करताना फोटोग्राफर्सना मारलं; परफेक्ट लोकेशनवर काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:18 IST2026-03-29T16:17:38+5:302026-03-29T16:18:17+5:30
कर्नाटकात एका प्री-वेडिंग फोटोशूट दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे.

Video - दे दणादण! प्री-वेडिंग शूट करताना फोटोग्राफर्सना मारलं; परफेक्ट लोकेशनवर काय घडलं?
तुम्ही कधी प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये गोंधळ झालेला पाहिला आहे का? सहसा प्री-वेडिंग शूटमध्ये एक कपल, एखादं सुंदर, शांत ठिकाण, क्रिएटिव्ह आयडिया आणि फोटोग्राफर्सची टीम असते. ही टीम दोन व्यक्तींच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांना कॅमेऱ्यात कैद करत असते. मात्र, कर्नाटकात एका प्री-वेडिंग फोटोशूट दरम्यान याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं. एका फोटोशूटचे रूपांतर थेट हिंसक घटनेत झालं आणि त्यामागचं कारण होतं फोटोग्राफर्सनी मंदिरात चप्पल-बूट घालून प्रवेश करणं.
मनमोहक 'बेट्टाडा भैरवेश्वर' मंदिरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराच्या परिसरात कपलचं प्री-वेडिंग फोटोशूट सुरू होतं. याच दरम्यान फोटोग्राफर्सचा एक ग्रुप चप्पल आणि बूट घालून मंदिराच्या परिसरात शिरला. ही बाब स्थानिक लोकांच्या निदर्शनास येताच ते संतप्त झाले. रागाच्या भरात लोकांनी फोटोग्राफर्सच्या ग्रुपवर हल्ला केला आणि पाहता पाहता या घटनेने हिंसक वळण घेतलं.
Pre-wedding photoshoot in temple turns violent, locals thrash photographers alleging they wore footwear inside temple premises. Incident at Bettada Bhairaveshwara Temple in Sakleshpur . Several injured, 7 people taken into custody. pic.twitter.com/OyuMAOaQpj
— Deepak Bopanna (@dpkBopanna) March 28, 2026
सकलेशपूर तालुक्यातील हा मंदिर परिसर आपल्या निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्री-वेडिंग शूटसाठी हे ठिकाण अत्यंत परफेक्ट मानलं जातं. एक कपल आपल्या काही फोटोग्राफर्ससह येथे शूटसाठी आलं होतं. शूट सुरू असताना, मंदिर परिसरात फोटोग्राफी करणं आणि फोटोग्राफर्सनी बूट-चप्पल घातल्यामुळे काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला आणि वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर हाणामारीत झालं.
काही लोकांनी फोटोग्राफर्सवर हल्ला केला, ज्यामध्ये एका कॅमेऱ्याचंही नुकसान झालं, कॅमेरे तोडले. जखमी फोटोग्राफर्सना उपचारासाठी सकलेशपूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकलेशपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आशी, प्रशांत, रक्षा, अरविंद, उचित, प्रज्वल आणि निशांत यांचा समावेश आहे. नवी आणि नंदन अशी जखमी फोटोग्राफर्सची नावे आहेत.