तेराव्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन हाणामारी; खुर्च्यांची फेकफेकी अन् चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 15:45 IST2021-12-08T15:45:15+5:302021-12-08T15:45:53+5:30

Crime News : तेराव्याचा कार्यक्रमात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दारू पिऊन रुद्र, प्रेम व त्यांच्या मित्रांनी धिंगाणा घालत मारामारी व चाकूने हल्ला केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Prayer Meet program, drinking and fighting, knife attack in Ulhasnagar | तेराव्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन हाणामारी; खुर्च्यांची फेकफेकी अन् चाकूहल्ला

तेराव्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन हाणामारी; खुर्च्यांची फेकफेकी अन् चाकूहल्ला

सदानंद नाईक


उल्हासनगर : कॅम्प नं-४ बंजारा कॉलनी रघुनाथनगर येथील दिपक चिंडलिया यांच्या आजोबांच्या तेराव्याचा कार्यक्रमात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दारू पिऊन रुद्र, प्रेम व त्यांच्या मित्रांनी धिंगाणा घालत मारामारी व चाकूने हल्ला केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर पूर्वेतील बंजारा कॉलनी रघुनाथनगर येथे राहणारे दीपक चिंडलिया यांच्या आजोबांच्या तेराव्याचा कार्यक्रम मंगळवारी ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या मंडपात सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान रुद्र व प्रेम यांनी दारू पिऊन मंडपातील खुर्च्यांची फेकफेकी सुरू केली. या गोष्टीचा राग येऊन दीपक याने असे कृत करू नका. असे सांगण्याचा प्रयत्न केला. या म्हणण्याचा राग रुद्र व प्रेम याला येऊन त्यांनी त्यांच्या दोन मित्राच्या मदतीने हाणामारी करून चाकूने हल्ला केला. यामध्ये दीपक व त्यांचा मेहुणा जखमी झाले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोन महिलेला दगडाचा मुका मार लागला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Prayer Meet program, drinking and fighting, knife attack in Ulhasnagar