प्रफुल्ल पटेल यांची ईडीने केली पुन्हा दहा तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 15:04 IST2019-06-12T15:02:11+5:302019-06-12T15:04:53+5:30
या प्रकरणी अटक केलेल्या दीपक तलवार यांच्याकडून पुरावे मिळाले आहेत.

प्रफुल्ल पटेल यांची ईडीने केली पुन्हा दहा तास चौकशी
ठळक मुद्देईडीच्या खान मार्केटच्या मुख्यालयात ते सकाळी १0 वाजता हजर झाले. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
नवी दिल्ली - माजी नागरी उड्डयनमंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. ईडीच्या खान मार्केटच्या मुख्यालयात ते सकाळी १0 वाजता हजर झाले. काल जवळपास १० तास त्यांची चौकशी झाली.
ईडीने प्रफुल्ल पटेल यांना बुधवारी, १२ जून रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. सोमवारी त्यांची जवळपास आठ
तास चौकशी झाली. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दीपक तलवार यांच्याकडून पुरावे मिळाले आहेत.