महिलेचे अश्लील फोटो ऑनलाईन होत होते शेअर, कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 08:15 PM2022-01-16T20:15:27+5:302022-01-16T20:16:52+5:30

Crime News : आश्‍चर्याची बाब म्हणजे आरोपी कोणी इतर नसून तो पीडित महिलेचा नवरा निघाला नाही. नाव बदलून हे घृणास्पद कृत्य तो करत होता.

Porn photos of wife post social media by husband arrested madhya pradesh | महिलेचे अश्लील फोटो ऑनलाईन होत होते शेअर, कारण ऐकून व्हाल हैराण

महिलेचे अश्लील फोटो ऑनलाईन होत होते शेअर, कारण ऐकून व्हाल हैराण

Next

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे महिलेचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे आरोपी कोणी इतर नसून तो पीडित महिलेचा नवरा निघाला नाही. नाव बदलून हे घृणास्पद कृत्य तो करत होता.

पत्नीचा फोटो एडिट करून पती सोशल मीडियावर पोस्ट करत होता

या प्रकरणी स्टेशन प्रभारी सुशील पटेल यांनी सांगितले की, पीडितेने तिमर्नी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तिने सांगितले होते की, एक तरुण तिचे फोटो एडिट करून अश्लील रीतीने सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने माहिती गोळा करून आरोपीला पकडले. आरोपी फिरोजने सांगितले की, त्याने सोनू सिंगच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी बनवून अश्लील फोटो शेअर केला होता.
    
बनावट इन्स्टाग्राम आयडी बनवून अश्लील फोटो शेअर केले


आरोपी तरुण फिरोज खान हा सिराली येथील रहिवासी असून तो तक्रारदार महिलेचा नवरा आहे. महिलेचा पती फिरोजसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे महिला माहेरी राहत आहे. पोलिसांनी आरोपी फिरोज याला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली

या घटनेतील आरोपी  पकडला गेल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सायबर सेलने या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि पाळत ठेवून आयपी ऍड्रेसच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

Web Title: Porn photos of wife post social media by husband arrested madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.