"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:01 IST2025-11-03T12:00:14+5:302025-11-03T12:01:50+5:30
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावरील एका फार्महाऊसमध्ये लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी नवरदेव आला नाही. कॉन्स्टेबल असलेल्या नवरदेवाने २० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याचं सांगितलं. नवरीच्या कुटुंबाने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. दौराला येथील मोहनपूर येथील रहिवासी महेश यांच्या मुलीचं लग्न परतापूर येथील कॉन्स्टेबल अभिषेकशी झालं होतं. ही घटना २ नोव्हेंबरच्या रात्री महामार्गावरील एका फार्महाऊसमध्ये घडली. लग्नाची वरात न येण्याचं कारण म्हणजे २० लाख रुपयांच्या रोख हुंड्याची मागणी पूर्ण झाली नाही.
१ नोव्हेंबर रोजी झालेल्या लग्नाच्या तयारीसाठी नवरीच्या कुटुंबाने लाखो रुपये खर्च केले. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, रोका समारंभासाठी २ लाख रुपये, १० लाखांचे दागिने, ५ लाखांच्य़ा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचर, ७ लाख रुपयांचा चेक, २ लाखांचे कपडे आणि इतर खर्च खर्च करण्यात आला. शिवाय, फार्महाऊस, जेवण आणि इतर व्यवस्थांवर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला.
महेश यांनी नवरदेवाच्या कुटुंबाला फोन केला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कुटुंबाने लग्नाची वरात आणण्यास स्पष्ट नकार दिला. फोनवरून २० लाख रुपयांचा रोख हुंडा मागितल्याचा आरोप आहे. आम्हाला २० लाख रुपये रोख हवे आहेत कारण ही रक्कम मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी खर्च झाली आहे. २० लाख रुपये जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत लग्नाची वरात येणार नाही असं सांगितलं. नवरीच्या कुटुंबाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.