Firing : सहकाऱ्यावर गोळी झाडली, नंतर स्वत:वर गोळी झाडून जवानाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 20:33 IST2022-06-01T20:24:37+5:302022-06-01T20:33:25+5:30
Firing And Suicide : दोघेही पुणे एसआरपीएफ ग्रुपमधील, गडचिरोलीत होते कर्तव्यावर

Firing : सहकाऱ्यावर गोळी झाडली, नंतर स्वत:वर गोळी झाडून जवानाने केली आत्महत्या
जिमलगट्टा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या मरपल्ली पोलीस ठाण्यामध्ये नक्षलविरोधी अभियानासाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने दुसऱ्या सहकाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रीकांत बेरड आणि बंडू नवथरे अशी त्यांची नावे असून, ते दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी तथा पुणे एसआरपीएफ ग्रुप-१ चे जवान होते. काहीतरी कारणावरून सकाळी या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर बंडू नवथरे कर्तव्यावर असताना श्रीकांत बेरड याने चार वाजण्याच्या सुमारास आपल्याकडील रायफलीमधून त्याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन स्वत:वरही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. जिमलगट्टावरून २० किलोमीटरवर दुर्गम भागात असलेल्या मरपल्ली पोलीस ठाण्यामधील या थराराने पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे.