खळबळजनक! वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 15:57 IST2019-06-29T15:55:38+5:302019-06-29T15:57:25+5:30
सुरेश बाबोळे (५०) असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव

खळबळजनक! वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
चंद्रपूर - एका पोलीस कर्मचाऱ्याने तो ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने वरोरा पोलीस ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश बाबोळे (५०) असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली आहे.
बाबोळे यांनी वरोरा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आत्महत्या केली. पोलिसांना समजताच त्यांनी बाबोळे यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे काय कारण आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पोलीस ठाण्यात कामावर येत नव्हते. शुक्रवारी ते अचानक पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी इथे येऊन आत्महत्या केली.
चंद्रपूर - वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2019