ऑपरेशन मुस्कान - १० अंतर्गत ५३ बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 18:34 IST2021-07-10T18:33:19+5:302021-07-10T18:34:08+5:30

Operation Muskan-10: ऑपरेशन मुस्कान - १० अंतर्गत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ५३ बालकांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. लहान मुलांची शोध मोहीम १ ते ३०  जून या कालावधीत राबविण्यात आली होती.

Police succeed in searching for 53 children under Operation Muskan-10 | ऑपरेशन मुस्कान - १० अंतर्गत ५३ बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश   

ऑपरेशन मुस्कान - १० अंतर्गत ५३ बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश   

मीरारोड  - ऑपरेशन मुस्कान - १० अंतर्गत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ५३ बालकांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. लहान मुलांची शोध मोहीम १ ते ३०  जून या कालावधीत राबविण्यात आली होती. पोलीस आयुक्त सदानंद दाते, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील ,  सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा भाईंदर व नालासोपारा तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यात आली. 

 हरवलेल्या किंवा पळवून नेलेल्या १८ वर्षां खालील बालकांचा शोध घेऊन ही मोहीम राबविण्यात आली.  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष मीरा-भाईंदर , नालासोपारा व  पोलीस ठाणे निहाय एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस अमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते.  या मोहिमेत  १८ वर्षाखालील १६ मुले व ३७ मुली असे एकूण ५३ बालकांना ताब्यात घेऊन चौकशी करून  सर्व बालकांना त्यांचे पालकांच्या ताब्यात देण्यात आले . त्यामध्ये पोलीस ठाणे अभिलेखावरील ४३ तर १० बेवारस बालकांचा समावेश आहे.  त्याचबरोबर २९४ हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यात आला. 

Web Title: Police succeed in searching for 53 children under Operation Muskan-10