शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
4
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
5
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
6
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
7
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
8
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
9
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
10
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
11
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
12
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
13
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
14
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
15
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
16
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
17
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
18
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
19
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
20
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ

हवालाचे पैसे महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच गायब; पोलिसांनीच हडपले १.४५ कोटी, महिला अधिकाऱ्याची 'डील' फसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:05 IST

मध्य प्रदेशात महिला पोलीस अधिकाऱ्याने हवालाचे पैसे लुटल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

MP Police Hawala Case: मध्य प्रदेशात पोलिसांच्या एका मोठ्या गैरकारभाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिवनी जिल्ह्यात हवाल्याचे पैसे जप्त केल्यावर, पोलिसांनीच त्यातील मोठा हिस्सा आपसात वाटून घेतला. गाडीत सापडलेल्या एकूण २.९६ कोटी रुपयांच्या रकमेपैकी सुमारे १.४५ कोटी रुपये गायब झाले. या चोरीच्या आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली  पूजा पांडे या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह एकूण १० पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

पोलीस अधिकारी पूजा पांडे यांना एका गुप्त बातमीदाराने सांगितले की, एका 'क्रेटा' कारमधून कटनीहून महाराष्ट्रातील नागपूरकडे ३ कोटी रुपये नेले जाणार आहेत. या माहितीनुसार, पूजा पांडे आणि त्यांच्या टीमने हायवेवर ती कार थांबवली आणि कारमधील सर्व पैसे पोलिसांच्या गाडीत भरले. ही घटना ८-९ ऑक्टोबरच्या रात्री घडली. पूजा पांडे यांच्या नेतृत्वाखाली एनएच-४४ वर वाहन तपासणी सुरू होती. ही गाडी कटनीहून नागपूरला जात होती. रात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान. पोलिसांनी महाराष्ट्र नोंदणी क्रमांक असलेल्या या कारला थांबण्याचा इशारा केला, पण ती थांबली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. शेवटी, कार चालकाला सिलादेही परिसरात गाडी थांबवावी लागली.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी हवाला व्यावसायिक सोहन परमार हा त्याच्या साथीदारांसह थेट पोलीस प्रमुख पूजा पांडे यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. सूत्रांनुसार, अनेक तास या दोघांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. अखेरीस, अर्धे पैसे तुम्ही ठेवा, अर्धे आम्हाला द्या असा सौदा झाला. पोलिसांनी १.५ कोटी रुपये स्वतःकडे ठेवले आणि बाकीचे पैसे व्यापाऱ्याला परत दिले. मात्र, व्यापाऱ्याला परत मिळालेल्या रकमेत २५ लाख ६० हजार रुपये कमी असल्याने आढळली. यामुळे चिडलेल्या व्यापाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोंधळ घातला. हा गोंधळ स्थानिक माध्यमांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी केलेला  गैरव्यवहार उघड झाला. त्यामुळे या घटनेची जोरदाक चर्चा सुरू झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश दिले. ९ ऑक्टोबरला ९ पोलीस कर्मचाऱ्यांवर, तर १० ऑक्टोबरला पूजा पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी अजूनही सुरू आहे.

दरम्यान, पूजा पांडे, अर्पित भैराम, मखन, रविंदर उईके, जगदीश यादव, योगेंद्र चौरसिया, रितेश,नीरज राजपूत, केदार, सदाफल ही निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Cops Steal Hawala Money: 1.45 Crore Vanishes in Maharashtra

Web Summary : Madhya Pradesh police officers allegedly stole ₹1.45 crore from seized hawala money. Ten officers, including a senior female officer, are suspended after a deal with the businessman went sour, exposing the crime and prompting an investigation.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस