आनंदवाडी शिवारातील दाेन फार्म हाऊसवर पाेलिसांची धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 21:16 IST2021-12-28T21:16:25+5:302021-12-28T21:16:50+5:30
Police Raid : चाकूर पाेलिसांची कारवाई : दाेन वाहने, चंदनासह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

आनंदवाडी शिवारातील दाेन फार्म हाऊसवर पाेलिसांची धाड
चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील अनंदवाडी शिवारात असलेल्या दाेन फार्म हाऊसवर चाकूर येथील पाेलीस पथकाने धाड टाकली. दरम्यान, पाेलीस पथकाने दाेन जीपसह ६१० किलाे चंदन असा जवळपास ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चाकूर पाेलिसांनी मंगळवारी पहटाेच्या सुमारास केली. याप्रकरणी दाेघांना पाेलिसांनी अटक केली आहे. यबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुुर आहे.