शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

औरंगाबादेत हायप्रोफाईल कुंटणखान्यावर गुन्हे शाखेचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 3:36 PM

गुप्त माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड बायपासजवळील दोन ठिकाणांवर छापा

औरंगाबाद - बीड बायपासपरिसरातील राजेशनगर येथील हायप्रोफाईल कुंटणखान्यावर गुन्हेशाखेने रविवारी रात्री छापा टाकरून शहरातील सर्वात मोठ्या मॉलचा व्यवस्थापकासह ४ ग्राहक, कोलकाता ,हैदराबाद आणि स्थानिक चार तरूणी, दोन आंटी आणि दोन दलालांना पकडले. यावेळी तेथे अवैध दारूसाठा, रोख रक्कम ,मोबाईल आणि अन्य साहित्य असा सुमारे १ लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त केला. दलाल संजय त्र्यंबक कापसे(४४,रा.गणेशनगर),दलाल विनोद टेकचंद नागवणे(रा. सिडको एन-४) , प्रोझोन मॉलचा व्यवस्थापक  ग्राहक महमंद अर्शद साजीद अली (२९,रा. चिकलठाणा एमआयडीसी), अमोल दामू शेजूळ (२९,रा.म्हाडा कॉलनी) ,ज्ञानेश्वर सर्जेराव जºहाड(४२,रा. बदनापुर),अजय सुभाष साळवे (२३,रा. आनंदनगर) आणि दोन आंटीचा आरोपीमध्ये समावेश आहे. यावेळी वेश्या व्यवसायाकरीता आणण्यात आलेल्या कोलकाता येथील दोन, हैदराबाद आणि शहरातील एक अशा एकूण चार तरुणींची मुक्तता करण्यात आली. याविषयी गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सांगितले की, बीडबायपासलगच्या राजेशनगर येथील एका घरात वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती खबºयाने गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांना दिली.यानंतर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कोडे यांनी गुन्हेशाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांचे पथक आणि दोन पंच, एक डमी ग्राहक यांना सोबत घेऊन राजेशनगर गाठले. संशयित घरात पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून त्याला वेश्यागमनासाठी तरूणीची मागणी करण्याचे सांगितले. तेथे गेल्यानंतर दलाल संजय कापसे आणि आंटीने त्यांच्याकडून  पैसे घेऊन त्यांच्यासमोर चार तरूणी उभ्या केल्या.यानंतर त्यांना एका खोलीत जाण्याचे सांगितले. यावेळी पोलिसांच्या डमी ग्राहकाने खिडकीतून इशारा करताच गुन्हेशाखेच्या अधिका-यांनी पंचासमक्ष त्या घरावर धाड टाकली. तरूणींची मुक्तता करण्यात आली आणि आंटी, दलालाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. शिवाय ग्राहकांनाही ताब्या यावेळी तेथे घेण्यात आलेल्या झडतीत  दारूच्या बाटल्या, ग्राहकांचे मोबाईल, रोख रक्कम जप्त करण्यात आली. दलाल, आंटी आणि ग्राहकांविरोधात अनैतिक देह व्यापर प्रतिबंधक कलमानुसार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हेशाखेचे निरीक्षक मधूकर सांवत हे तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद