A police officer sexually abused a female police officer by pretending to be married | लग्नाचा भूलथापा देऊन पोलीस अधिकाऱ्याने महिला अधिकाऱ्याचे केले लैंगिक शोषण 

लग्नाचा भूलथापा देऊन पोलीस अधिकाऱ्याने महिला अधिकाऱ्याचे केले लैंगिक शोषण 

ठळक मुद्देमुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईत पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत ही घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.


मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष देऊन अनेकदा लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिला अधिकाऱ्याने केला आहे.

 

पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने तक्रारीत लग्नासंबंधी विचारले असता आरोपीने स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या कुटुंबातील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस अधिकारी हा दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, अशी माहिती मिळते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Web Title: A police officer sexually abused a female police officer by pretending to be married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.