अपघातानंतर पोलिसांचा दुचाकीस्वारांना दणका; गाड्या ताब्यात घेत अनेकांवर दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:50 IST2021-12-07T17:48:56+5:302021-12-07T17:50:11+5:30
Accident Case : यावेळी पोलीस निरीक्षक कोरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाईची मोहीम आखली. यावेळी वाहतूक पोलीस राजा राणे, सुनील नाईक, रामचंद्र साटेलकर आदींनी ही कारवाई केली.

अपघातानंतर पोलिसांचा दुचाकीस्वारांना दणका; गाड्या ताब्यात घेत अनेकांवर दंडात्मक कारवाई
सावंतवाडी : शहरात मंगळवारी सकाळी घडलेल्या दुचाकी अपघाताच्या पार्श्वभूमिवर सावंतवाडीपोलिसांनी महाविद्यालयीन तसेच अल्पवयीन दुचाकी चालकांच्या विरोधात अचानक जोरदार मोहीम उघडली. यावेळी अनेकांच्या गाड्या ताब्यात घेत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडे दुचाकी आढळून आल्यास, त्या मुलांसमवेत पालकांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी दिला. यावेळी पोलीस निरीक्षक कोरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाईची मोहीम आखली. यावेळी वाहतूक पोलीस राजा राणे, सुनील नाईक, रामचंद्र साटेलकर आदींनी ही कारवाई केली.
सावंतवाडी शहरात दोघा महाविद्यालयीन युवकांच्या दुचाकी समोरासमोर आदळून भीषण अपघात घडला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र याची गंभीर दखल घेत सावंतवाडी पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. दरम्यान येथील भोसले उद्यान परिसरात अल्पवयीन महाविद्यालयीन दुचाकीस्वारांवर कारवाई करत तब्बल १५ हून अधिक दुचाकी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेल्या. यावेळी संबंधितांच्या पालकांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. दरम्यान पालक आणि दुचाकी चालक प्रत्येकी पाचशेप्रमाणे एका कारवाई एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर विना लायसन्स पुन्हा दुचाकी चालवताना आढळल्यास थेट दुचाकी जप्त केली जाईल, असा सज्जड दम त्यांना भरण्यात आला.
सावंतवाडी शहरात दोघा महाविद्यालयीन युवकांच्या दुचाकी समोरासमोर आदळून भीषण अपघात घडला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले pic.twitter.com/1e8IQIVmxe
— Lokmat (@lokmat) December 7, 2021