अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 18:07 IST2020-05-30T18:05:36+5:302020-05-30T18:07:05+5:30

मिरेक डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे आयुक्त जॉन हैरिंगटन यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डेरेक चाउविन सोमवारी मृत जॉर्ज लॉयडचे मान दाबताना दिसला.

Police have detained a police of killing a black man in the United States pda | अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात 

अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात 

ठळक मुद्देअमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या अश्वेत व्यक्तीच्या  हत्येचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अमेरिकेच्या मिनियापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर अमेरिकेत बरीच खळबळ उडाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी निषेध केला.

मिनिपोलिस - अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यातील एका अश्वेत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुरू झालेली निदर्शने मिनीपोलीस क्षेत्राच्या बाहेरही पसरली आहेत. निदर्शकांनी सेंट पॉल मार्गावर लुटमार व जाळपोळ केली होती, तसेच ते यापूर्वी हिंसक निदर्शने झालेल्या जागीही गेले होते, जेथे आधीच मोठे नुकसान झालेले होते. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या अश्वेत व्यक्तीच्या  हत्येचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अमेरिकेच्या मिनिपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने ही बाब सांगितली. मिरेक डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे आयुक्त जॉन हैरिंगटन यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डेरेक चाउविन सोमवारी मृत जॉर्ज लॉयडचे मान दाबताना दिसला.

हैरिंगटन यांनी पत्रकारांना सांगितले की, “मला नुकतीच ब्यूरो ऑफ क्रिमिनल अपीयरेंसचे अधीक्षक एंड्रयू इवांस यांच्याकडून माहिती मिळाली आहे की फ्लॉयडच्या मृत्यूच्या प्रकरणात डेरेक चाउविन या पोलीस अधिकाऱ्याची ओळख पटली आहे आणि त्याला बीसीएने ताब्यात घेतले आहे" विशेष म्हणजे जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर अमेरिकेत बरीच खळबळ उडाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी निषेध केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

या हत्येप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी एका पोलीस ठाण्याला आग लावली असून नंतर ते ठाणे रिकामे करण्यात आले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रेसिंक्ट पोलीस ठाणे तातडीने रिकामे करण्यात आले. एका व्हिडिओमध्ये निदर्शक पोलीस ठाण्यात घुसताना व इमारतीला आग लावताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्थितीवर - नेतृत्वाचा पूर्ण अभाव - अशी टिप्पणी केली. फ्लोयडच्या मृत्यूनंतर सलग तिसऱ्या रात्रीही निदर्शने झाली होतो. लुटमारीपासून वाचण्यासाठी व्यावसायिकांनी आपल्या दुकानांच्या खिडक्या, दारे बंद केल्या. अमेरिकेतील एका कंपनीने आपले दोन डझनावर स्टोअर्स तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली होती.

 

बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे ताब्यात

 

मोबाईलवर येत होते अश्लील मेसेज आणि फोटो, दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

Web Title: Police have detained a police of killing a black man in the United States pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.