शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

'तुम नहीं मिली तो गर्दन काट लूंगा', असं म्हणणाऱ्या पतीने पत्नीचे दागिने-रोकड लुटून काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 4:18 PM

Crime News : अशा लोकांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून ते दुसर्‍या मुलीचे आयुष्य खराब करू शकत नाहीत, असे पीडितेची आईने म्हटले आहे.

ठळक मुद्देलग्नानंतर महिलेचा नवरा घरात ठेवलेल्या सर्व दागिन्यांसह रोख रक्कम लुटून फरार झाला.पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. 

आधी फेसबुकवरून एका मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करून तिची फसवणूक करून पतीने पळ काढला. असा प्रकार कोलकातामधील एका महिलेसोबत घडला आहे. या महिलेने त्रास सहन करत एक वर्षांनंतर आपल्या फसवणूक केलेल्या पतीच्या घरी पोहोचून एकच गोंधळ घातला आणि उत्तर प्रदेशातील फतेहपूर पोलिसांकडे न्याय मागितला आहे. 

या महिलेचे म्हणणे आहे की, लग्नाआधी पती आत्महत्येची धमकी देत ​​असे. तो म्हणायचा की जर तू लग्नाला होकार दिला नाही, तर मी ब्लेडने गळा कापून आत्महत्या करेन. मात्र, आता तो फसवणूक करून पळून गेला आहे. अशा वाईट लोकांना तुरुंगात पाठवावे, अशी या महिलेची मागणी आहे. लग्नानंतर महिलेचा नवरा घरात ठेवलेल्या सर्व दागिन्यांसह रोख रक्कम लुटून फरार झाला. तसेच, पोलिसांनी लवकरच त्याला अटक केली जाईल, असे आश्वासनही दिले आहे. 

या महिलेने आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी कोलकाता पोलिसांसह जिल्ह्यातील पोलिसांकडे संपर्क साधला आहे. यानंतर ही महिला पोलिसांसह पती अभिषेक आर्य याच्या घरी पोहोचली. घराचे कुलूप पाहून महिलेने जोरदार गोंधळ घातला. पीडित महिला दिपाली (नाव बदलले आहे) हिने म्हटले आहे की, अभिषेक आर्याने फेसबुकवर मैत्री केली. ओळखीनंतर कुटुंबातील लांबचे नातेवाईक असल्याचे दिसून आले. काही दिवसांनंतर अभिषेकने लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. 

याचबरोबर, अभिषेकने गळ्यास ब्लेड लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तू माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर मी गळा कापून घेईन, असे म्हटले. मात्र त्यानंतर, दिपालीने याकडे दुर्लक्ष केले. पण, अभिषेक दिल्लीहून थेट विमानाने कोलकाताला गेला. कोलकाता येथे पोहोचल्यानंतर अभिषेकने तिला लग्नाची खात्री पटवून दिली. त्यानंतर दोघांचे लग्न झाले आणि हॉटेलमध्येच राहिल्याचे दिपालीने सांगितले. अभिषेकचे वडील राजू आर्य बँक ऑफ बडोदामध्ये काम करतात. ते येथे आल्यावरही गायब झाले आहेत. इतकेच नाही तर अभिषेकने तिच्या घराच्या लॉकरमध्ये ठेवलेले तीन लाखांच्या दागिन्यांसह १ लाख रोख रक्कम घेऊन पळून गेला आहे, असे दिपालीने सांगितले.

अशा लोकांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून ते दुसर्‍या मुलीचे आयुष्य खराब करू शकत नाहीत, असे पीडितेची आईने म्हटले आहे. तर पीडित महिला कोलकाता पोलिसांसोबत आली होती, त्यासाठी कोतवाली पोलीस आणि डीएसपी सिटीला मदतीसाठी सांगितले आहे. लवकरच आरोपीला अटक करुन कोलकाता पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, असे एसपी सतपाल अंतिल यांनी सांगितले.

दिपालीने तक्रार केली आहे की, फतेहपूरच्या एका मुलाने फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर लग्न केले. यानंतर काही वेळाने मुलगा पैसे आणि दागिने घेऊन फरार झाला. कोलकाता येथे यासंदर्भात खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशन कोतवाली आणि सीओ सिटी यांना या प्रकरणाची योग्य ती मदत करण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून या प्रकरणाची योग्य चौकशी होऊ शकेल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस