शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

अर्धनग्न अवस्थेतील बेशुद्ध पडलेली अल्पवयीन मुलगी पोलिसांना आढळली; नशेचं इंजेक्शन देऊन केला बलात्कार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:34 IST

Rape Case : खाऊ देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला बोलावून घेतलं आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केले. शेजारी राहणाऱ्या मेडिकल दुकानदाराकडे विश्वासाने पाठवलेल्या मुलीसोबत त्याने विश्वासघात करत हे दुष्कृत्य केले. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. 

बरेली - अल्पवयीन मुलीला नशेचं इंजेक्शन देऊन एका मेडिकल दुकानदाराने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला बोलावून घेतलं आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केले. शेजारी राहणाऱ्या मेडिकल दुकानदाराकडे विश्वासाने पाठवलेल्या मुलीसोबत त्याने विश्वासघात करत हे दुष्कृत्य केले. त्यामुळे मुलीच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. 

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी नुकतीच ट्यूशन क्लासवरून परत आली होती. आईसोबत ती घरी चालली असताना समोरच असलेल्या मेडिकल दुकानदाराने तिला बोलावले. काहीतरी काम असेल म्हणून तिच्या आईने तिला तिथेच सोडलं आणि ती घरी निघून गेली. दुकानदाराने मुलीला मेडिकल दुकानात बोलावलं आणि बसायला सांगितलं. गप्पा मारल्यानंतर मुलीचं लक्ष नसताना त्यानं अचानक एक नशेचं इंजेक्शन तिला टोचलं. नंतर मुलगी बेशुद्ध झाली. दरम्यान, दुकानाचं शटर खाली करून त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. इतर व्यापाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला. काहीजण मुलीच्या घरी गेले आणि याबाबत माहिती दिली. 

क्रेटा कार हुंड्यात दिली नाही म्हणून भावी पतीने रद्द केला लग्नसोहळा

लग्नाच्या 7 महिन्यांनंतर पती-पत्नीने केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिले, 'आयुष्यात खूप गोंधळ आहे...

काही वेळातच दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी जमली आणि शटर उघडण्याचा प्रयत्न सर्वजण करू लागले. यावेळी दुकानदाराची आई आणि त्याचा भाऊ यांनी बाहेर जमलेल्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने शटर आतून बंद केल्यामुळे ते उघडलं जात नव्हतं. बाहेर गर्दी जमल्यावर आणि आरडाओरडा सुरू झाल्यानंतर देखील दुकानदारानं आपलं दुष्कृत्य सुरूच ठेवलं होतं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये अर्धनग्न अवस्थेतील बेशुद्ध पडलेली मुलगी त्यांना सापडली. पोलिसांनी मेडिकल दुकानदाराला अटक केली. त्याच्याविरोधात पॉक्सो अन्वये बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मुलीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदाUttar Pradeshउत्तर प्रदेश