क्रेटा कार हुंड्यात दिली नाही म्हणून भावी पतीने रद्द केला लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 09:36 PM2021-12-08T21:36:07+5:302021-12-08T21:39:19+5:30

Dowry Case :लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे नवऱ्याकडील मंडळी लग्नासाठी आली नाहीत. त्यामुळे लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची आणि हुंडा मागितल्याची तक्रार तरुणीने पोलीस ठाण्यात केली होती. 

The man canceled the wedding because did not give the Creta car as a dowry | क्रेटा कार हुंड्यात दिली नाही म्हणून भावी पतीने रद्द केला लग्नसोहळा

क्रेटा कार हुंड्यात दिली नाही म्हणून भावी पतीने रद्द केला लग्नसोहळा

googlenewsNext

महेंद्रगढ - क्रेटा गाडी हुंड्यात देण्याची मागणी पूर्ण न केल्याने लग्न मोडलेल्या तरुणीला आता अनेक उच्चशिक्षित तरुणांची स्थळं  येऊ लागली आहे. लग्नातहुंडा म्हणून क्रेटा कार दिली नाही, अशी तक्रार करत भावी पतीने लग्नसोहळा रद्द केला. लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे नवऱ्याकडील मंडळी लग्नासाठी आली नाहीत. त्यामुळे लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची आणि हुंडा मागितल्याची तक्रार तरुणीने पोलीस ठाण्यात केली होती. 

त्या तरुणीचं हुंड्याला विरोध केल्यानं आता सर्व स्तरातून कौतुक होत असून हुंडा न घेता लग्न करण्यासाठी अनेक उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ तरूण या तरुणीला मागणी घालत असल्याचं दिसत आहे. हरियाणातील महेंद्रगढमध्ये राहणाऱ्या तरुणीचे २२ नोव्हेंबर रोज लग्न ठरलं होतं. मात्र, १४ लाखांची क्रेटा कार द्या अशी भावी नवरा अट घालून बसला होता. या हट्टापायी त्यादिवशी वराकडील मंडळी लग्नासाठी आलीच नाहीत. वधूकडील सर्वजण तयारी करून वराकडील मंडळींच्या स्वागतासाठी सज्ज होते. मात्र, आपल्याला क्रेटा कार मिळाली नाही म्हणून अडून बसलेल्या नवऱ्याने लग्नच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

फ्लॅट पाहण्याच्या बहाण्याने बोलावून महिला प्रॉपर्टी ब्रोकरवर बलात्कार

निर्दयी पित्याने नशेत ३ महिन्यांच्या चिमुकल्याला भिंतीवर आपटले अन्... 

यामुळे संतापलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकारामुळे आपली समाजात बदनामी झाली असून तरुण आणि त्याच्या आईवडिलांविरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली होती. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आणि त्यांची जामीनावर सुटका झाली.

Web Title: The man canceled the wedding because did not give the Creta car as a dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.