उच्चभ्रू वस्तीत ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 23:48 IST2018-08-10T23:46:38+5:302018-08-10T23:48:28+5:30

उच्चभ्रू वस्तीत ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई - मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत लाखो रुपयांचे ब्राऊन शुगरची तस्करीसाठी आलेल्या टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राकेश गोवर्धनलाल हिरोइया उर्फ धोबी याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून 1 किले 5 ग्रँमचे ब्राऊन शुगर हस्तगत केले आहे.
भांडुपमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईनंतर आयुक्तांनी मुंबईतल्या सर्व परिमंडळांना अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आंबोली पोलिसांना त्यांना वि.रा.देसाई रोड परिसरात लाखो रुपयांच्या तस्करीसाठी एक जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. त्या परिसरात राजेश संशयितरित्या फिरत असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता. पोलिसांना त्याच्याजवळ 1 किलो 5 ग्रँमची ब्राऊन शुगर मिळून आली. बाजारभावात या ब्राऊन शुगरची किंमत 30 लाख रुपये आहे. अंधेरीच्या उच्चभ्रू वस्तीत तो ब्राऊन शुगरची तस्करी करण्यासाठी आला असल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली आहे.