धक्कादायक! सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 18:49 IST2019-11-02T18:47:37+5:302019-11-02T18:49:09+5:30
घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

धक्कादायक! सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू
ठळक मुद्दे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.विनोद तांबोळी (44) यांचा लोकलच्या धडकेने जागीच मृत्यू
पनवेल - रायगडमधील मुरुड पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विनोद तांबोळी (44) यांचा लोकलच्या धडकेने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
पनवेलनजीक सिमरम मोटर्सच्या मागील बाजूस रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडली. या घटनेत विनोद तांबोळी यांचा जागीच मृत्यू झाला.विनोद तांबोळी यांच्या पत्नी देखील पोलीस दलात कार्यरत आहे. त्यांना एक मुलगा आहे. तो महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.विनोद तांबोळी यांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संबंधित घटनेची नोंद पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.