पॉक्सोप्रकरणी शिक्षिकेस अटक, १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 20:36 IST2018-09-28T20:35:36+5:302018-09-28T20:36:25+5:30
कांदिवली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत आरोपी शिक्षिकेस अटक केली. तिला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पॉक्सोप्रकरणी शिक्षिकेस अटक, १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई - कांदिवलीतील एका शाळेत ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत आरोपी शिक्षिकेस अटक केली. तिला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लैंगिक अत्याचाराबाबत ४ वर्षाच्या चिमुकलीने घरी पालकांनी खोदून खोदून शिताफीने विचारल्यानंतर शाळेत महिला शिक्षिका शरीराच्या काही भागाला स्पर्श करते असे पालकांना सांगितले. त्यानंतर संबंधित पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना हा प्रकार सांगितला. नंतर पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.