लग्नाच्या आमिषाने पोलीस कॉन्स्टेबलचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 17:48 IST2018-08-06T17:43:22+5:302018-08-06T17:48:00+5:30
लग्नाच्या आमिषाने पोलीस कॉन्स्टेबलने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

लग्नाच्या आमिषाने पोलीस कॉन्स्टेबलचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
पुणे : लग्नाच्या आमिषाने पोलीस कॉन्स्टेबलने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.यासंदर्भात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी कृष्णा जयराम फुले (वय २४) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी फुले शिवाजीनगर मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करतो. त्याच्या विरोधात 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे.या फिर्यादीत फुले याने संबंधित तरुणीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवले असे नमूद केले आहे. याशिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला शिवीगाळ व हाताने मारहाण केली असून संबंधित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख आहे.ऑगस्ट २०१७ ते 2 ऑगस्ट २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.