शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस बनली पत्नी! वेषांतर करून लहान मुलांच्या तस्करीच्या रॅकेटचा केला पर्दाफाश

By पूनम अपराज | Updated: August 2, 2022 14:16 IST

Child trafficking : याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७० (४), जे जे ऍक्ट २०१५ कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पूनम अपराज 

मुंबई : एका 35 वर्षीय महिलेला आणि तिच्या महिला साथीदाराला 15 दिवसांच्या चिमुरडीला 4.5 लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अँटॉप हिल पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी ज्युलिया फर्नांडिस हिच्यावर मानवी तस्करीच्या अनेक केसेस आहेत. तसेच जीटीबी नगर येथील आनंद नगरमधील अहाना नर्सिंग होममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. येथून २ मोबाईल आणि २ हजार रुपयांसह महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७० (४), जे जे ऍक्ट २०१५ कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पुण्यातील कोंढवा येथील दत्तक केंद्रात काम करणारे आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) चे सदस्य असलेल्या जयप्रकाश जाधव यांच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एक महिला नवजात मुलीसाठी खरेदीदार शोधत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक महिला आणि बालकल्याण प्राधिकरणाला सतर्क केले. त्यावरून ही पुढे कारवाईस चालना मिळाली. 

मुंबई पोलिसांच्या सामाजिक शाखेच्या विशेष बाल संरक्षण युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी फर्नांडिसला पकडण्यासाठी काम  काम सुरु केले आणि जाधव यांना तिच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. फोनवर, तिने 4.5 लाखांची मागणी केली आणि सांगितले की ४ लाख बाळाच्या पालकांना दिले जातील आणि बाकीचे ती तिचे कमिशन म्हणून ठेवेल. फर्नांडिसने जाधव यांना रविवारी सायन कोळीवाडा येथील अहाना नर्सिंग होमला भेट देण्यास सांगितले. जाधव यांच्यासोबत एक पोलीस हवालदार होता, जो त्याची पत्नी म्हणून उभा होता, सिव्हिल वेशातील अनेक पोलीस परिसरात वेढा घालून होते.नर्सिंग होममध्ये नवजात अर्भकाला तिची केअरटेकर शबाना शेख (३०) घेऊन आली होती. पैशाची देवाणघेवाण होताच दोन्ही महिलांना अटक करण्यात आली. नर्सिंग होमची कोणतीही नोंदणी पोलिसांना आढळून आली नाही. या प्रकरणात त्याची भूमिका तपासत आहे. दोन महिलांवर मानवी तस्करी आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, फर्नांडिसला मानखुर्द आणि वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी अशाच गुन्ह्यांसाठी अटक केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईHuman Traffickingमानवी तस्करीArrestअटक