गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या अाराेपीला पाेलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:33 IST2018-09-01T16:30:56+5:302018-09-01T16:33:18+5:30
विविध १६ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला पाेलीसांनी अटक केली अाहे. खून व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल अाहेत.

गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या अाराेपीला पाेलिसांनी केली अटक
चिंचवड: विविध प्रकारचे १६ गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात चिंचवड पोलिसांना अखेर यश आले आहे. रणजित बापू चव्हाण उर्फ रंज्या (२३, रा.वेताळनगर,चिंचवड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. चिंचवड,निगडी,वाकड व वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत त्याच्यावर विविध प्रकारचे १६ गुन्हे दाखल असून यात खून व खुनाचा प्रयत्न असे ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
अनेक दिवसांपासून पोलीस यंत्रणा याचा शोध घेत होती. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा गुन्हेगार वारंवार पळ काढत होता.याच्या त्रासाला व दाहशतीला अनेक जण घाबरत होते. चिंचवड गावात भर चौकात आकाश लांडगे या तरुणाचा मे महिन्यात खून झाला होता. या खुनातही हा सहभागी असल्याची चर्चा होती. इतर पोलीस स्टेशन हद्दीतही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर होती. चिंचवड पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार रणजीत याला उस्मानाबाद जवळील भूम येथून अटक करण्यात आली असल्याचे चिंचवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी सांगितले आहे.पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.