शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पैशांचा पाऊस पाडणारे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 3:56 PM

गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली आहे.

ठळक मुद्देएका कारमध्ये बसून काही जण पैशांचा पाऊस पाडण्याची चर्चा करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.रिझर्व बँक ऑफ इंडीयाचे बनावट पत्र देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.

मुंबई - तांत्रिक विद्येद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात, अटक आरोपी खेळण्यातील नोटांद्वारे गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालत असल्याचेही समोर आले. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली आहे.

वांद्रे येथील लालमट्टी झोपडपट्टीजवळ एका कारमध्ये बसून काही जण पैशांचा पाऊस पाडण्याची चर्चा करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे वपोनि महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पथकाने चौकडीला ताब्यात घेतले. त्यापैकी निश्वीतकुमार रविराज शेट्टी (३६) हा गेल्या अनेक वर्षापासून अशाप्रकारे फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली. त्याने, अनेकांकडून बंक खात्यावर तसेच रोखी को़ट्यवधी रुपये घेतल्याची माहिती समोर आली.शेट्टी आणि त्याचे साथीदार लोकांना काळी जादू दाखवून आत्माला बोलावून तांत्रिक विद्येच्या जोरावर पैशांचा पाऊस पाडत असल्याचे सांगायचे. आणि गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील रक्कमेच्या ५० पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत असे. या आमिषाला बळी पडून अनेक व्यावसायिकांनी गुंतवणूक केलई. पुढे गुंतवणुकीची रक्कम हाती पडताच ही मंडळी नॉट रिचेबल होत असे. तेथून ठिकाणे आणि मोबाईल क्रमांक बदलून ते नव्या सावजाच्या शोधात असल्याचे पोलीस तपासात समोर आले.त्यांच्या कारमधून पोलिसांनी ’भारतीय बच्चो का बँक’ असे लिहिलेल्या नोटाही हस्तगत केल्या आहेत. तसेच अ‍ॅम्बसी ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या नावाचे बनावट पत्र, काळ्या कापडाची बाहुली, ५ नारळ, रंगीत धाग्यांची गुंडी, हळद, कुंकू, लिंबू, काळे तीळ, सुया आणि काळे कापड मिळून आले. त्यानुसार, त्यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेट्टी हा मिरारोडचा रहिवासी असून फायनान्सचे काम करतो. त्याच्या राहत्या घरातील खोली पैशाने भरलेली असल्याचा आभास निर्माण केला. त्यासाठी त्याने थर्माकॉलला पाचशे ते दोन हजार रुपयांच्या खोट्या नोटा चिकटवलेल्या दिसून आल्या. याद्वारेच तो व्यावसायिकांचा विश्वास संपादन करत असे. यात फसलेल्या तक्रारदार व्यावसायिकाची १ कोटी १२ लाख ४१ हजार रुपयाची फसवणूक केली. शिवाय, गुंतवणूकदारांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील. यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडीयाचे बनावट पत्र देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. देसाई यांच्या मार्गदर्शनखाली तपास पथक पोलीस निरिक्षक संजीव गावडे, आशा कोरके, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधीर जाधव, शरद धराडे, वाल्मीक कोरे, पोलीसउपनिरिक्षकविजयेंद्र आंबवडे आणि अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईMONEYपैसा