अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील प्रियकरास पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 07:31 PM2020-08-22T19:31:41+5:302020-08-22T19:32:21+5:30

आपल्याकडे अद्भुतशक्ती असून त्याचा वापर करून मुख्य भूमिका मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले होते. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

Police arrested boyfriend in actress' suicide case in Delhi | अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील प्रियकरास पोलिसांनी केली अटक 

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील प्रियकरास पोलिसांनी केली अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देमीरारोडच्या शिवार उद्यान परिसरातील रॉयल नेस्ट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सेजल शर्मा (२६) हिने शुक्रवार २४ जानेवारी रोजी बेडरूम मधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मीरारोड - मीरारोडमध्ये राहणाऱ्या सेजल शर्मा या मालिका व जाहिरातीत काम करणाऱ्या अभिनेत्रीने जानेवारीमध्ये केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिच्या दिल्लीतील प्रियकरास मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे. आपल्याकडे अद्भुतशक्ती असून त्याचा वापर करून मुख्य भूमिका मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले होते. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 


मीरारोडच्या शिवार उद्यान परिसरातील रॉयल नेस्ट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सेजल शर्मा (२६) हिने शुक्रवार २४ जानेवारी रोजी बेडरूम मधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दिल्लीतील तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ ( ३०) यानेच पोलिसांना फोन करून सेजलने आत्महत्या करणार असल्याचे सांगितल्याचे कळवले होते. पहाटे पोलिसांनी सेजलच्या घरी धाव घेतली असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती . तिने अत्म्हत्ये पूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत कोणी जबाबदार नसल्याचे लिहले होते. परंतु सेजलच्या आईने पोलिसांना तक्रार करून आदित्य आणि सेजलमध्ये भांडणं होत असल्याचे सांगितले होते.

त्या अनुषंगाने सेजल आत्महत्या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम व मीरारोड पोलिसांनी चालवला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पोलिसांनी वशिष्ठ याला तपासकामी बोलावले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता . वशिष्ठची सेजल सोबत ओळख २०१८ सालात सुमारे दिड वर्षां पूर्वी झाली होती . तो देखील मालिका - सिने क्षेत्रात नशीब चमकावण्यासाठी आला होता . यातूनच दोघांची ओळख व पुढे जवळीक झाली . त्याला मालिका आदी क्षेत्रात संधी मिळाली नसली तरी तो दिल्ली वरून सेजल भेटण्यास येत असे.

मूळची राजस्थानच्या उदयपूरची असणारी सेजल "दिल तो हॅप्पी है जी"  या मालिकेत काम करत होती . या शिवाय तिने अभिनेते आमिर खान , क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सोबत जाहिरातीत काम केले होते . "दिल तो हॅप्पी है जी" हि मालिका बंद पडल्याने गेल्यावर्षी ऑगस्ट पासून तिच्या कडे दुसरे काम नव्हते.

दरम्यान आरोपीने आपल्याला अद्भुत शक्ती असून त्या बळावर मी तुला मालिका आणि चित्रपटात प्रमुख भूमिका मिळवून देणार असल्याचे आमिष सेजल हिला दिले होते . दोघां मध्ये भांडणे होत होती . आरोपीने काही कारण सांगून पैसे घेतले असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे . पोलिसांना दोघां मध्ये झालेले चॅटिंग आदी सापडले आहे . जादूटोणा कायद्या सह आत्महत्येस प्रवृत्त करणे , फसवणूक करणे प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ . शशिकांत भोसले यांनी सांगितले कि ,  गुरुवारी आम्ही आदित्य वशिष्ठ ह्या आरोपीला सेजल शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या बाबत पोलीस तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Web Title: Police arrested boyfriend in actress' suicide case in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.