भरधाव कार, काळ्या काचा अन् थरारक पाठलाग; भाजपा नेत्याच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा आरोपी पकडला

By प्रविण मरगळे | Updated: February 19, 2026 08:14 IST2026-02-19T08:13:37+5:302026-02-19T08:14:02+5:30

संपूर्ण काळ्या काचा असणारी ती फॉर्च्यूनर उलट्या बाजूने मालेगावच्या दिशेने पसार झाली पण एक साथीदार सोडून इतर लोक पळाले.

Police arrest absconding accused in murder case in Dhule due to BJP leader Ajit Chavan alertness | भरधाव कार, काळ्या काचा अन् थरारक पाठलाग; भाजपा नेत्याच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा आरोपी पकडला

भरधाव कार, काळ्या काचा अन् थरारक पाठलाग; भाजपा नेत्याच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा आरोपी पकडला

धुळे - भाजपाचे सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मालेगावहून धुळ्याच्या दिशेने जाणारी वेगवान फॉर्च्यूनर कार आणि त्यात बसलेले आरोपी उज्जैनला निघाले होते. आरोपी ज्या कारमधून चालले होते त्या वाहनाच्या काचा गडद काळ्या रंगाच्या होत्या. त्याशिवाय वाहनाला कुठलीही नंबरप्लेट नव्हती. हायवेवर अतिशय वेगाने जात असलेल्या कारचा त्याच मार्गावरून प्रवास करणाऱ्या भाजपा नेते अजित चव्हाण यांना संशय आला. ही कार पाहताच क्षणी संशयास्पद वाटल्याने अजित यांनी तात्काळ ११२ नंबरवर कॉल करून ही माहिती पोलिसांना दिली. 

याबाबत अजित चव्हाणांनी म्हटलं की, या कारमधील लोक कुणाचे तरी अपहरण करून चाललेत का अशी शंका वाटल्याने मी पोलीस मदतीकरता ११२ हेल्पलाइनला फोन केला. त्यांनीही अतिशय तत्परतेने संपूर्ण माहिती जाणून घेतली. धुळे जिल्ह्यातल्या आर्वीच्या आसपास मी होतो तेव्हा हेल्पलाइनने तातडीने स्थानिक पोलिसांना कॉल दिला त्यांचा मला लागलीच मेसेज आला. ज्या पोलिसांना कॉल दिला होता ते धुळे ग्रामीणचे होते त्यांचा मोबाईल नंबर देखील माझ्यापर्यंत पोहोचला. मी खात्री करण्यासाठी थोड्यावेळाने त्या पोलिसांना फोन केला तेव्हा ते घाईत होते म्हणाले तक्रार मिळाली आहे. फोन करतो. पटकन फोन ठेवला असं त्यांनी सांगितले. हा संपूर्ण अनुभव अजित चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

तर काही वेळाने मी पोलिसांना फोन केला तेव्हा पुढचा सगळा थरार कळाला. मी ११२ ला फोन केल्यानंतर स्थानिक ग्रामीण पोलिसांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी विलास बागुल यांना हा कॉल दिला. ते आर्वी इथल्या परीक्षा केंद्रावरती ड्युटीवर होते. हा कॉल मिळताच पटकन ते हायवेवर आले काही मिनिटातच भरधाव वेगाने ती गाडी त्यांना धुळ्याच्या दिशेने जाताना दिसली. त्यांनी संबंधित गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी आम्ही नगरसेवक आहोत असं सांगून तपासणी करायला टाळाटाळ केली परंतु पोलीस बागुल यांनी आग्रह सोडला नाही. नाईलाजाने त्या गाडी मधला एक  इसम खाली उतरला. विलास बागुल यांनी गाडीची झडती घेण्यासाठी सगळ्यांना खाली उतरायला सांगितले. पोलीस तपासणी करतानाच आपल्या त्या साथीदाराला खाली सोडून संपूर्ण काळ्या काचा असणारी ती फॉर्च्यूनर उलट्या बाजूने मालेगावच्या दिशेने पसार झाली पण एक साथीदार सोडून इतर लोक पळाले अशी माहिती अजित चव्हाण यांनी दिली. 

दरम्यान, नक्कीच काहीतरी काळबेरं आहे याची खात्री बागुलांना झाली.  फॉर्च्यूनरमधून खाली राहिलेला तो इसमही मालेगावच्या दिशेने पळायला लागला. पण बागुल यांनी दीड किलोमीटर पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. तिथून त्याला पोलीस स्टेशनला आणत अंगझडती, मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पकडलेला व्यक्ती राहुल धुमाळ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील असून खुनाच्या गुन्ह्यातील क्रमांक एकचा फरार आरोपी असल्याचे पोलिसांना कळले. कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करून ही सगळी मंडळी भगवान महाकाल दर्शनासाठी उज्जैनकडे निघाली होती. मात्र अजित चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे खूनाचा आरोपी पोलीस तावडीत सापडला. 

Web Title : भाजपा नेता की सतर्कता से धुले में हत्या का आरोपी गिरफ्तार

Web Summary : धुले में भाजपा नेता की सतर्कता से हत्या के एक संदिग्ध को गिरफ्तार किया गया। एक तेज रफ्तार, काली कांच वाली कार पर संदेह होने पर, उन्होंने पुलिस को सतर्क किया। पुलिस ने वाहन को रोका, जिससे पीछा करने के बाद अहिल्यानगर में हत्या के वांछित भगोड़े को पकड़ लिया गया।

Web Title : Alert BJP Leader Helps Nab Murder Suspect After Car Chase

Web Summary : A BJP leader's quick thinking led to the arrest of a murder suspect in Dhule. Suspecting a speeding, tinted-windowed car, he alerted police. Police intercepted the vehicle, leading to a chase and the capture of the fugitive wanted for murder in Ahilyanagar.