प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:17 IST2025-10-10T12:16:13+5:302025-10-10T12:17:30+5:30
पत्नीने बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीची हत्या केली. प्राची असं पत्नीचं नाव असून रिहान हे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव होतं.

प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीची हत्या केली. प्राची असं पत्नीचं नाव असून रिहान हे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव होतं. आसिफ आणि प्राचीच लग्न झालं होतं. तर रिहान हा आसिफचा जुना मित्र होता. मार्च २०२४ मध्ये आसिफ काही वादामुळे जेलमध्ये गेला. याच दरम्यान प्राची आणि रिहान यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
एप्रिल २०२५ मध्ये जेव्हा आसिफ जामिनावर घरी परतला तेव्हा त्याला प्राचीच्या बदललेल्या वागण्यावर संशय आला. त्याने तिला याबाबत विचारलं. पण प्राचीने उत्तर द्यायला टाळाटाळ केली. तिने आपला मोबाईल देखील लपवला. शेवटी संतापलेल्या प्राचीने बॉयफ्रेंड रिहानला याबाबत सांगितलं. एकत्र राहायचं असेल तर आसिफचा काटा काढायला लागेल असं म्हटलं. यानंतर दोघांना मिळून दोन प्लॅन रचले,
प्लॅन A
रिहानने प्राचीला ड्रग्ज आणि विष दिले जेणेकरून ती हळूहळू आसिफला मारू शकेल. पतीला ड्रग्ज मिसळून मारण्याचा प्लॅन होता. तसेच यामुळे कोणालाही काहीही संशय येणार नाही. पण नशिबाने वेगळाच प्लॅन केला होता. आसिफ वाचला. हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला, पण आता रिहान आणि प्राची यामुळे जास्तच संतापले. त्यांनी पुन्हा मारण्याचा कट रचला.
प्लॅन B
७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास गाझियाबादच्या रफिकाबाद गेटजवळ झुडुपांच्या मागे पाच जण लपले होते. रिहान, बिलाल, झीशान, उवैस, गुलफाम आणि दानिश. सर्वजण पिस्तूल घेऊन सज्ज होते. आसिफला संपवणं हे फक्त एकच ध्येय त्यांनी ठेवलं होतं. प्राचीने रिहानला फोन करून आसिफची माहिती दिली.
आसिफ त्याच्या स्कूटरवरून निघाला. रफिकाबाद गेटजवळ पोहोचताच अचानक गोळीबार झाला. एक गोळी थेट आसिफच्या छातीत लागली. तो जागीच कोसळला - तो दररोज ज्या रस्त्यावरून जात होता. या घटनेनंतर पोलिसांना माहिती मिळाली. मसूरी पोलिसांनी ४८ तासांत तपास केला. पुरावे - मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन आणि मेसेजेस - गोळा केले तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले. सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून आसिफची पत्नी प्राची असल्याचं निष्पन्न झालं. तिने तिचा बॉयफ्रेंड रिहानसह तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला आहे.