शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

रोहित रेगेकडून जप्त केलेल्या पिस्तुलचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाशी संबंध नाही : बचाव पक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 7:44 PM

सदर पिस्टल सीबीआयने आॅगस्ट २०१८ मध्ये औरंगाबाद येथून जप्त केले होते. त्यानंतर ते गुजरात येथील फॉरेंसिक लॅबमध्ये तपासणीकरीता पाठविण्यात आले होते.

ठळक मुद्देगुजरात फॉरेंसिक लॅबने दिला बॅलेस्टिक रिपोर्ट याबाबतचा अहवाल नुकताच सीबीआयला प्राप्त झाला असून हा अहवाल नकारात्मक

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरे याच्या मेहुण्याचा मित्र रोहित रेगे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध नसल्याची दावा बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी शुक्रवारी केला. गुजरात फॉरेंसिक लॅबने बंदुकीबाबत दिलेला बॅलेस्टिक रिपोर्ट नकारात्मक असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले.      ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील आरोपीने अंदुरेकडे ७.६५ मिमी बोअरचे पिस्तुल, तीन जीवंत काडतुसे दिले होते. अंदुरे याने ११ आॅगस्टला त्याच्याकडील पिस्तुल मेव्हुणा शुभम सूर्यकांत सुरळेकडे दिले.अंदुरेच्या अटकेचे वृत्त समजताच शुभमने ते पिस्तुल चुलत भाऊ अजिंक्य शशिकांत सुरळेकडे सोपविले. शुभमच्या सांगण्यावरुन ते रोहित रेगेकडे लपवण्यासाठी देण्यात आले. सदर पिस्टल सीबीआयने आॅगस्ट २०१८ मध्ये औरंगाबाद येथून जप्त केले होते. त्यानंतर ते गुजरात येथील फॉरेंसिक लॅबमध्ये तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल नुकताच सीबीआयला प्राप्त झाला असून हा अहवाल नकारात्मक आहे. सीबीआय केवळ काय तपास केला हे सांगत आहे. मात्र पिस्तुलच्या तपासात काय निष्पन्न झाले हे ते सांगत नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. चंडेल यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.सय्यद यांच्या न्यायालयात शुक्रवारी केला.        दोषारोपपत्र सादर करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयास नाही. त्याबाबत मद्रास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देण्यात आले. दोषारोपपत्र दाखल करण्यास वाढ हवी असेल तर तपास पूर्ण का झाला नाही?, सरकारी वकीलांचा अहवाल तसेच खटल्यातील महत्वांच्या मुद्यांवर काय तपास झाला?, अजून कोणत्या मुद्यांवर तपास करावयाचा आहे?, आरोपीला कारागृहात का ठेवयाचे आहे? या सर्व गोष्टी सीबीआयने स्पष्ट करणे गरजेचे होते. परंतु सीबीआयने सादर केलेला अहवालतून ठोस काही निष्पन्न होत नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड.चंडेल आणि अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केला.      सीबीआयचे वकील पी. राजू म्हणाले, रेगे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात वापर असल्याचा दावा आम्ही कधी केलेला नाही. अमोल काळे याला गौरी लंकेश खून प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची डॉ. दाभोलकर प्रकरणातील भूमिका स्पष्ट झाली आहे. .....................तपासात काय प्रगती हे स्पष्ट करावे मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात आलेलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा सुरुवातीला सीबीआयने केला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले हे अद्याप सीबीआयने स्पष्ट केले नाही. तपासात सीबीआयने नेमकी काय प्रगती केली हे सांगितले नाही. त्यांनी विरेंद्र तावडेंवर जे आरोपपत्र दाखल झाले त्याच आरोपपत्रातील मुद्दे पुन्हा मांडून ९० दिवसांची वाढ मागितली आहे. त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात येऊ नये असे अ‍ॅड. पुनावळेकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCrime Newsगुन्हेगारीMurderखूनCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग