गणेशोत्सवानिमित्त लावलेल्या बॅनरवरील भाजप राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे छायाचित्र फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 21:35 IST2018-09-15T21:34:57+5:302018-09-15T21:35:37+5:30

बॅनर फाडणाऱ्या एकाला पोलिसांनी केली अटक

The photograph of BJP's Minister of State Ravinder Chavan on the banner posted on Ganesh Festival | गणेशोत्सवानिमित्त लावलेल्या बॅनरवरील भाजप राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे छायाचित्र फाडले

गणेशोत्सवानिमित्त लावलेल्या बॅनरवरील भाजप राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे छायाचित्र फाडले

डोंबिवली - गणोशोत्सवानिमित्त विविध मंडळांनी स्वागताच्या कमानी उभारल्या आहे. डोंबिवली कोपर रोडवरील एका गणोश मंडळाने उभारलेल्या शुभेच्छा कमानीद्वारे भाजप राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गणोश भक्तांचे स्वागत व शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर त्यांचे छायाचित्र होते. बॅनरवरील चव्हाण यांचे छायाचित्र कोणी तरी फाडले. ही घटना कळताच पोलिसांनी बॅनरवरील राज्यमंत्र्यांचे छायाचित्र फाडणा:याचा शोध सुरु केला. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याचे नाव सिद्धार्थ मोरे असं आहे. अन्य एकाचा या प्रकरणात समावेश आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरुनच हा प्रकार आरोपीने केला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: The photograph of BJP's Minister of State Ravinder Chavan on the banner posted on Ganesh Festival