शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मुळशी धरणात पोहण्यासाठी गेलेला एकजण बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 7:45 PM

पाषाण येथील रहिवासी असलेला अजय हा एका कुरिअर कंपनीत कामाला होता. होळीची सुट्टी असल्याने तो सकाळीच मित्रांसमवेत मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता.

पौड : मुळशी खुर्द (ता.मुळशी) धरणाच्या बॅक वॉटर मध्ये (दि .२० ) होळीच्या दिवशी आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पोहायला गेलेला असताना अजय घोडगे (वय २२,  रा.पाषाण) हा तरुण मुळशी धरणात पोहताना बुडाला. सदर घटनेची प्रत्यक्षदर्शी पंकज मोरे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या सुचनेनुसार पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली.परंतु उशीर झाल्याने व अंधार पडल्याने २० मार्च रोजी त्याचा शोध घेता आला नव्हता. ता.२१ रोजी सकाळी लवकरच पौडचे पोलीस, एनडीआरएफचे जवान व मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीम यांचे शोधपथक अजयचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते.पाषाण येथील रहिवासी असलेला अजय हा एका कुरिअर कंपनीत कामाला होता. होळीची सुट्टी असल्याने तो सकाळीच मित्रांसमवेत मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता.दुपारी २ ते ३ च्या सुमारास तो मित्रांसोबत मुळशी खुर्द गावाच्या हद्दीत धरणात पोहण्यासाठी उतरला. पाण्यात बराच आत गेल्याने पोहताना त्याला दम लागल्याने बुडाला. या भागात धरणात अंतर्गत प्रवाह व पाण्याची खोली अधिक असल्याने यापूवीर्ही अशा बुडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच टाटा कम्पनी कडून या परिसरात पोहण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही अजयच्या अति धाडसामुळे त्याला प्राण गमवावे लागले. मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते व एनडीआरएफच्या शोध पथकाने २१ मार्च रोजी दिवसभर शोध घेतल्यानंतर संध्याकाळी ५ च्या सुमारास अजयचा मृतदेह सापडला. यावेळी पौडचे पोलीस उपनिरीक्षक लवटे, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास पौडचे पोलीस स्टेशनचे बिटअंमलदार मुजावर हे करत आहेत.

टॅग्स :PaudपौडDamधरणDeathमृत्यू