The pedestrian death in a speedly vehicle at charholi | चऱ्होली येथे भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू
चऱ्होली येथे भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

पिंपरी : भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. दाभाडे वस्ती, चऱ्होली बुद्रुक येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
प्रताप नागनाथ झोंबाडे (वय ४०) असे या अपघातातमृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. तर गणेश सीताराम घायतिडके (वय ३०, रा. ओझर, ता. जुन्नर) असे आरोपी वाहनचालकाचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश दशरथ कळंके यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रताप झोंबाडे हे त्यांच्या पत्नीसह पायी जात होते. त्यावेळी आरोपी गणेश घायतिडके हा नवीन ट्रकची चेसी चालवून घेऊन जात होता. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून आरोपी घायतिडके वाहन हयगयीने भरधाव चालवत असताना पादचारी झोंबाडे यांना वाहनाने धडक दिली. यात झोंबाडे यांचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The pedestrian death in a speedly vehicle at charholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.