पुन्हा जळीतकांड : कल्याण येथे जाळल्या सात दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 17:31 IST2019-01-15T17:28:44+5:302019-01-15T17:31:03+5:30
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुन्हा जळीतकांड : कल्याण येथे जाळल्या सात दुचाकी
ठळक मुद्देअज्ञात इसमांनी सात दुचाक्यांना आग लावली. रात्रीच्या सुमारास परिसरात धूर पसरल्याने नागरिकांनी इमारतीखाली धाव घेतली
कल्याण - कल्याण पूर्व येथील मलंग रोड परिसरातील हिरा पन्ना सोसायटीत सोमवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी सात दुचाक्यांना आग लावली. या आगीत सात दुचाकींचे नुकसान झाले. रात्रीच्या सुमारास परिसरात धूर पसरल्याने नागरिकांनी इमारतीखाली धाव घेतली असता त्यांना दुचाकींना आग लावण्यात आल्याचे लक्षात आले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.