patna daughter in law did murder of mother in law | भयंकर! सूनेनं केली सासूची हत्या; मृतदेहाचे डोळे काढले, बोटं कापली अन्...

भयंकर! सूनेनं केली सासूची हत्या; मृतदेहाचे डोळे काढले, बोटं कापली अन्...

नवी दिल्ली - बिहारची राजधानी पाटणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. छळाला कंटाळून एका सूनेनं आपल्या सासूची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. संतापाच्या भरात सूनेने सासूचे डोळे फोडले आहेत. तसेच बोटं देखील कापली. या हत्येनंतर सूनेने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच सासू आणि सूनेमध्ये सातत्याने वाद होत होते. यातूनच सूनेनं टोकाचं पाऊल उचल्याचं म्हटलं जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. धर्मशीला देवी असं मृत सासूचं नाव आहे. तर आरती देवी असं सूनेचं नाव आहे. सासूची हत्या केल्यानंतर सूनेने तिचे डोळे काढले. हाताची बोटं देखील कापली. या भयंकर प्रकारानंतर सूनेनं स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती होरपळली आहे. सध्या सूनेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेटची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीचे सासरे राजकुमार साव आणि सासू धर्मशीला देवी हे दोघं कायम तिला मारहाण करत असतं. याच कारणामुळे आरतीने सासूची हत्या केली आहे. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेऊन तिने सासूची हत्या करण्याचा निर्णय घेतला. सासू आणि सूनेचं दररोज भांडण होत होतं. दोघांच्या भांडणांमुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होतं. घरात कोणीही नसताना सूनेने सासूवर चाकूने हल्ला केला. हत्या केल्यानंतर तिने सासूचे डोळे काढले आणि बोटं कापल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सासूची हत्या केल्यानंतर आरतीने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं असताना ती घराबाहेर आहे. त्यावेळी तिला पाहून स्थानिकांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. आगीत होरपळलेल्या आरतीला तात्काळ पाटणा येथील पीएमसीएच येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सासूचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेचा ते अधिक तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

Web Title: patna daughter in law did murder of mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.