दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशाला लोकलमध्ये चढू न देत प्रवाशांनी केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 22:15 IST2018-07-27T22:12:49+5:302018-07-27T22:15:08+5:30
विनायक चव्हाण यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत

दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशाला लोकलमध्ये चढू न देत प्रवाशांनी केली मारहाण
ठाणे - आज सकाळी ८.३९ ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल विनायक चव्हाण दिवा रेल्वे स्थानकातून पकडत होते. दरम्यान काही प्रवाश्यांचे टोळकं लोकलच्या दरवाज्यावर उभं होतं. त्यांनी विनायकला लोकलमध्ये चढू न देत जबर मारहाण केली. या मारहाणीत विनायकाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी ठाणे रेल्वे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हि लोकल पकडत असताना लोकलच्या दरवाज्यात उभं असलेल्या प्रवाश्यांच्या जमावाने विनायकाला लोकलमध्ये चढू दिले तर नाहीच त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विनायकाच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून त्याने ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही तपासून अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.